Debt Recovery Harassment Mumbai: कर्ज वसुली एजंटांच्या त्रासाला कंटाळून जिम ट्रेनरची आत्महत्या; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल, मुंबई येथील घटना
मुंबईतील 25 वर्षीय जिम ट्रेनरने कर्जवसुली एजंटांच्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. त्याने आत्महत्येपूर्वी व्हिडीओ रेकॉर्ड करून चौघांची नावं घेतली असून वडाळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि तपास सुरू आहे.
Gym Trainer Suicide Mumbai: मुंबईच्या धारावीतील 25 वर्षीय खासगी जिम ट्रेनरने कर्जवसुली एजंटांच्या सततच्या मानसिक त्रासाला (Debt Recovery Agent Harassment) कंटाळून गुरुवारी दुपारी लोकलखाली उडी मारून आत्महत्या (Mumbai Suicide Case) केली. मृताचे नाव राहुल विश्वकर्मा (Rahul Vishwakarma Suicide) असे असून आत्महत्येपूर्वी त्याने आपल्या कुटुंबियांसाठी तीन भावनिक व्हिडीओ मेसेज रेकॉर्ड करून पाठवले. त्यामध्ये त्याने चार एजंटांची नावं घेतली असून त्यांच्यामुळेच त्याला टोकाचं पाऊल उचलावं लागल्याचा आरोप केला आहे. ही घटना टिळक नगर आणि चेंबूर स्थानकांदरम्यान घडली. रेल्वेखाली उडी घेतल्यानंतर त्याच्या खिशातून सापडलेल्या एटीएम कार्डाच्या आधारे त्याची ओळख पटली. राहुलने घेतलेल्या वैयक्तिक कर्जाची (Personal Loan Pressure) परतफेड झाली असल्याचा दावा त्याने व्हिडीओमध्ये केला आहे, मात्र त्याच्यावर अजूनही भरमसाठ व्याजासाठी एजंटांकडून दबाव आणला जात होता.
एजंटांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा
व्हिडीओमध्ये राहुल म्हणतो, माझ्या आत्महत्येला हे चार जण जबाबदार आहेत. त्यांचा त्रास सहन होत नाही. म्हणून मी हे पाऊल उचलत आहे. त्यांना माफ करू नका. राहुलचे कुटुंबीय हे व्हिडीओ घेऊन स्थानिक पोलीस ठाण्यात गेले, पण तोपर्यंत त्याने आत्महत्या केली होती. वडाळा रेल्वे पोलीस (GRP) यांनी या प्रकरणी चार कर्जवसुली एजंटांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. वडाळा जीआरपीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अर्शुद्दीन शेख यांनी सांगितले की, आत्महत्येच्या एक दिवस आधी राहुल आपल्या मैत्रिणीकडे जयपूर येथे गेला होता, मात्र एजंटांच्या धमक्यांमुळे त्याला मुंबईत परत यावे लागले. यामुळे तो मानसिक तणावात होता. (हेही वाचा, Beed Father Commits Suicide Outside Bank Gate: बँकेत अडकले पैसे, लेकीचं लग्न अडलं; बापाचा बँकेच्या गेटवरच गळफास, बीड येथील घटना)
प्रकरणाचा तपास सुरु
राहुलने घेतलेल्या नेमक्या कर्जरकमेचा तपास अद्याप सुरू असून पोलिस व्हिडीओ मेसेज तपासत आहेत आणि पुढील चौकशी करत आहेत. या एजंटांनी कर्ज वसुली करताना कायदेशीर मार्ग पाळला होता का, याचा शोध पोलीस घेत आहेत. (हेही वाचा, Mumbai Shocker: पालकांनी फोनवर गेम खेळण्यास मनाई केल्याने 14 मुलीची आत्महत्या; मुंबईतील गोरेगावच्या आरे कॉलनीतील धक्कादायक घटना)
वाचकांसाठी सल्ला: जर तुम्ही स्वत: किंवा तुमच्या परिचयातील कोणीही व्यक्ती मानसिक ताण, मानसिक आरोग्यविषयक समस्या किंवा इतर कोणत्या अन्याय, अत्याचाराच्या घटनांमुळे आत्महत्येच्या विचारांनी ग्रस्त असाल, तर कृपया व्यावसायिक मदत घ्या किंवा मानसिक आरोग्य हेल्पलाइनशी संपर्क साधा. विनामुल्य सेवा आणि माहितीसाठी खालील संपर्क क्रमांकावर संपर्क साधा. हे सर्व क्रमांक टोल फ्री आहेत. त्यावरुन मागितलेल्या मदत, मार्गदर्शनासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही.
आत्महत्या प्रतिबंध आणि मानसिक आरोग्य हेल्पलाइन क्रमांक:
टेली मानस (आरोग्य मंत्रालय): 14416 किंवा 1800 891 4416; निमहंस: + ९१ + 91 80 26995000 /5100 /5200 /5300 /5400; पीक माइंड: 080-456 87786; वांद्रेवाला फाउंडेशन: – 9999 666 555; अर्पिता आत्महत्या प्रतिबंध हेल्पलाइन: 080-23655557; आयकॉल: 022-25521111 आणि 9152987821 आणि 9152987821; सीओओजे मेंटल हेल्थ फाउंडेशन (सीओओजे): 0832-2252525.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)