Nitin Gadkari Received Death Threats: नितीन गडकरींना जिवे मारण्याची धमकी; कार्यालयात दोनदा आला धमक्यांचा फोन

याचा पोलीस तपासात करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी 11.30 ते 12.30 च्या दरम्यान धमकीचे फोन आले होते.

Nitin Gadkari (Photo Credit - PTI)

Nitin Gadkari Received Death Threats: केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. गडकरींच्या नागपुरातील कार्यालयात दोन वेळा फोन करून धमकावण्यात आले. याचा पोलीस तपासात करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी 11.30 ते 12.30 च्या दरम्यान धमकीचे फोन आले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (14 जानेवारी) रात्री 11:30 ते 12:30 च्या दरम्यान गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयाला दोन धमकीचे फोन आले. ज्यात खंडणी न दिल्यास केंद्रीय मंत्री गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. यासोबतच दाऊदचे नावही घेतले होते. (हेही वाचा - Nitin Gadkari On Old Vehicle: वाहनांना १५ वर्ष पुर्ण झाल्यास गाड्या भंगारात जाणार, प्रदुषण टाळण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा मोठी घोषणा; पहा व्हिडीओ)

गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयाने पोलिसांना तीन धमकीचे फोन आल्यानंतर घटनेची माहिती दिली. यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी गडकरी यांच्या कार्यालयात पोहोचले असून तपास सुरू आहे. (हेही वाचा - Nitin Gadkari: अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणींच्या कामामूळे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात सत्ता आली : नितीन गडकरी)

मोदी सरकारच्या मंत्र्यांमध्ये नितीन गडकरी यांचे मोठे नाव आहे. गडकरी हे नेहमी चांगल्या कामांसाठी ओळखले जातात. यासोबतच नितीन गडकरी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतात. ट्विटर आणि फेसबुकसह त्यांचे स्वतःचे यूट्यूब चॅनल देखील आहे. गडकरींना धमकी आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.