Mumbai Man Falling Into a Manhole: मॅनहोलमध्ये पडून सफाई कामगाराचा मृत्यू, बोरिवली येथील घटना
महाराष्ट्राच्या मुंबईत गुरुवारी मॅनहोलमध्ये सफाई करताना सफाई कामगाराचा पडून मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बीएमसी अधिकाऱ्यांनी दिली. गुरुवारी सफाई कर्मचारी साफ सफाई करत होता. ही घटना गोखले रोडवरील सिंपोली रोडवर घडली
Mumbai Man Falling Into a Manhole: महाराष्ट्राच्या मुंबईत गुरुवारी मॅनहोलमध्ये सफाई करताना सफाई कामगाराचा पडून मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बीएमसी अधिकाऱ्यांनी दिली. गुरुवारी सफाई कर्मचारी साफ सफाई करत होता. ही घटना गोखले रोडवरील सिंपोली रोडवर घडली. या घटनेनंतर परिसरात बीएमसी अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे अशी नागरिकांनी विनंती केली आहे. (हेही वाचा-ठाणे, पालघर, नाशिक, रायगड जिल्ह्यातील महामार्गावरील खड्ड्यांबाबत राज्य सरकार गंभीर; मुख्यमंत्री करणार रस्त्यांची पाहणी)
मिळालेल्या माहितीनुसार, बोरिवली पश्चिम येथे संध्याकाळी ४. ३० च्या सुमारास ही घटना घडली. बीएमसी अधिकाऱ्यांनी माहिती दिली, की गुरुवारी साफसफाई कर्मचाऱ्यांचा मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला. सुनील सिध्दार्थ वाकोडे (३५) असं मृताचे नाव आहे, बोरिवली येथील एका हॉटेल समोर मॅनहोल होते. ते साफ करण्यासाठी दोघे जण आले होते.
योग्य परवानगी न घेता मॅनहोल उघडण्यात आल्याचे बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. माहिती मिळताच, मुंबई अग्निशनम दलाचे बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी बचाव कार्य सुरु झाले. वाकोडे यांना मॅनहोलमधून बाहेर काढण्यात आले. त्यांना तात्काळ बीडीबीए रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. अशी माहिती अधिकाऱ्यांनी सांगितले.
(The above story first appeared on LatestLY on Aug 09, 2024 11:54 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

