Deadline for Fitting New HSRP: वाहनचालकांना दिलासा; HSRP बसविण्यासाठी 30 जून पर्यंत मुदतवाढ

HSRP नंबर प्लेट लावण्यासाठी दुचाकीला 450, तीनचाकीला 500 तर चारचाकीला 745 रूपये मोजावे लागणार आहेत.

HSRP @InfoRaigad

महाराष्ट्र सरकार कडून राज्यात उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (HSRP) बसविण्यासाठी दिलेली अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. 1 एप्रिल 2019 च्या आधी रजिस्टर असलेल्या वाहनांमध्ये High-Security Registration Plates बसवणं राज्यात बंधनकारक करण्यात आले आहे. 31 मार्च ही त्याची अंतिम मुदत होती. पण त्याला आधी 30 एप्रिल आणि आता 30 जून पर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे. वाहन चालकांनी त्यांची नंबरप्लेट HSRP न केल्यास त्यांना Motor Vehicles Act, 1988 च्या सेक्शन 177 अंतर्गत 1000 रूपयांचा दंड आकारला जाणार आहे.

HSRP साठी कसा कराल अर्ज?

HSRP साठी साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी Maharashtra Transport Department ची अधिकृत वेबसाईट www.transport.maharashtra.gov.in वर अर्ज करता येणार आहे. त्याच्या माध्यमातून वाहकचालकांना अपॉईंटमेंट दिली जाणार आहे.

  1. अधिकृत वेबसाईट वर HSRP Online Booking link वर क्लिक करा.
  2. आता Regional Transport Office (RTO) code निवडा.
  3. आता तपशील टाकून authorized HSRP vendor’s website कडे जा.
  4. VAHAN portal वर तुमचा वाहन नंबर, मोबाईल नंबर टाका.
  5. fitment center, तारीख, वेळ निवडा.
  6. ऑनलाईन पेमेंट करा.
  7. HSRP fitment center वर तुम्ही निवडलेल्या वेळेवर भेट द्या आणि प्लेट लावून घ्या.

HSRP नंबर प्लेट लावण्यासाठी दुचाकीला 450, तीनचाकीला 500 तर चारचाकीला 745 रूपय मोजावे लागणार आहेत. FASTag Mandatory: फास्टटॅग नसल्यास 1 एप्रिलपासून दुप्पट भरावा लागणार टोल; पहा कसा बनवायचा फास्टटॅग ऑनलाईन, ऑफलाईन .

वाहन चोरी रोखणे, बनावट नंबर प्लेटसाठी होणारा गैरवापर टाळण्यासाठी तसेच वाहतूक व्यवस्थापन सुधारण्यासाठी भारत सरकारने HSRP नंबर प्लेट बंधनकारक केली आहे.  अधिकृत डीलर किंवा परिवहन विभागाच्या मान्यताप्राप्त केंद्रांवर HSRP नंबर प्लेट बसवता येते. HSRP नंबर प्लेटला एक युनिक पिन नंबर असतो त्याच्या माध्यमातून गाडीची माहिती मिळवता येणार आहे. दरम्यान या नंबरप्लेटचे स्क्रू बदलता येत नाही त्यामुळे प्लेट्स बदलण्याचा धोका कमी होतो.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement