Daughter-in-law Donates Liver for Father-in-law: सासऱ्यासाठी सुनेने केले यकृत दान; रोबोटिक शस्त्रक्रियेद्वारे करण्यात आले प्रत्यारोपण

गुजरातच्या सुरत येथील रहिवासी असलेल्या संजय विराटिया (वय, 58) यांना 2019 मध्ये आरोग्य तपासणीदरम्यान यकृताला सूज आल्याचे निदान झाले.

यकृत दान प्रतिकात्मक प्रतिमा (PC - Pixabay)

Daughter-in-law Donates Liver for Father-in-law: यकृतासंदर्भातील तीव्र आजाराशी झुंज देत असलेल्या सासऱ्यांना यकृत दान (Liver Donation) करून एका 33 वर्षीय महिलेने समाजासमोर नवा आदर्श उभा केला आहे. सुनेने आपल्या यकृताचा काही भाग मुंबईच्या रुग्णालयात केलेल्या रोबोटिक लिव्हर ट्रान्सप्लांट (Robotic Liver Transplant) द्वारे दान केला.

गुजरातच्या सुरत येथील रहिवासी असलेल्या संजय विराटिया (वय, 58) यांना 2019 मध्ये आरोग्य तपासणीदरम्यान यकृताला सूज आल्याचे निदान झाले. त्यानंतर, त्यांची प्रकृती खालावली. अनेक डॉक्टर त्यांच्या आजाराचे अचूक निदान करू शकले नाहीत. आरोग्याच्या समस्यांसाठी पुढील उपचारासाठी, त्यांना मुंबईला जाण्याची शिफारस करण्यात आली. जिथे डॉक्टरांनी जिवंत दात्याचे यकृत प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला. (हेही वाचा - Energy Drinks Ban in Maharashtra: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! शाळांजवळ 500 मीटरच्या परिघात 'कॅफिनयुक्त' एनर्जी ड्रिंक्सच्या विक्रीवर घालण्यात येणार बंदी)

एक योग्य यकृत दाता शोधत असताना, विराटियाची सून मित्तल पुढे आली आणि तिने निस्वार्थपणे तिच्या यकृताचा एक भाग दान केला. तिच्या या उदारपणामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. परळ येथील ग्लेनेगल्स हॉस्पिटलमध्ये मित्तलच्या सासऱ्यांवर जटिल रोबोटिक प्रत्यारोपण करण्यात आले. (हेही वाचा - Panel To Probe Pooja Khedkar's Candidature: आयएएस अधिकारी पूजा खेडकरशी संबंधित वादांची चौकशी होणार; उमेदवारी तपासण्यासाठी केंद्राने स्थापन केली समिती (Watch))

संजय विराटिया यांनी सांगितले की, माझ्या सुनेने न डगमगता यकृत दान केल्याबद्दल मी तिचा आभारी आहे. तिने माझा जीव वाचवण्यासाठी पुढे येऊन काळजी आणि प्रेम दाखवले आहे. या वैद्यकीय संकटासारख्या आव्हानात्मक काळात खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या अशा जबाबदार आणि काळजीवाहू सून मिळाल्याबद्दल मी धन्यता मानतो. तसेच मित्तलने सांगितलं की, आमचे रक्तगट जुळत असल्याने मी माझ्या सासरच्यांचा जीव वाचवण्याच्या निर्णयावर ठाम राहिले.