Nisarga Cyclone: येत्या 3 जूनला 'निसर्ग' चक्रीवादळ अलिबाग येथे 100-110kmph वेगाने धडकणार

महाराष्ट्रात एनडीआरएफच्या एकूण 10 तुकड्या तैनात करण्यात आल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

Cyclone (Photo Credits-Twitter)

अम्फान (Amphan) चक्रीवादळानंतर आता निसर्ग (Nisarga) चक्रीवादळाची परिस्थिती उद्भवणार असल्याने राज्य सरकारकडून त्याचा सामना करण्यासाठी तयारी केली आहे. महाराष्ट्रात एनडीआरएफच्या एकूण 10 तुकड्या तैनात करण्यात आल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. तर येत्या 3 जूनला महाराष्ट्राच्या उत्तर भागात निसर्ग चक्रीवादळ धडकणार असल्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. तर आता अलिबाग येथे ही 3 जूनला दुपारच्या वेळी 100-110 kmph वेगाने चक्रीवादळ जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे समुद्रात निर्माण होणाऱ्या परिस्थितीबाबत महाराष्ट्रातील किनारपट्टीच्या क्षेत्रात आपत्ती व्यवस्थापनाच्या दलाकडून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सुचन्या दिल्या जात आहेत.(Nisarga Cyclone च्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात 3 जूनला पहाटे 2 पासून 48 तास संचारबंदी)

समुद्रात मच्छिमारीसाठी गेलेल्या मच्छिमारांना सुद्धा बोटी समुद्राच्या किनारी घेऊन जाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे. त्याचसोबत पुढील दोन-तीन दिवस मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये असे ही सांगितले आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार अरबी समुद्रामध्ये तयार झालेला कमी दाबाचा पट्टा येत्या काही तासांमध्ये अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरात या भागात निसर्ग चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे. या काळात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बरसण्याची शक्यतादेखील वर्तवण्यात आली आहे.(Nisarga Cyclone: निसर्ग चक्रीवादळाची परिस्थिती निर्माण होणार असल्याने माहिम येथील समुद्रातील मच्छिमार बोटीसह परतले)

निसर्ग चक्रीवादळ 1 ते 4 जून दरम्यान नॉर्थ महाराष्ट्र आणि गुजरात येथे घोंघावणार आहे. या दोन्ही राज्याच्या किनारपट्टीवरुन निसर्ग चक्रीवादळ जाणार आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे राज्य सरकार अलर्ट झाले असून यासंबंधित महाराष्ट्र आणि गुजरात येथे चक्रीवादळापूर्वी सुचना देण्यात आली होती.