Cyclone Nisarga: कोथरुडच्या उपऱ्या पाटलांनी बोंब मारली नाही असे सहसा घडत नाही; भाजप प्रदेशाध्य चंद्रकांत पाटील यांच्यावर शिवसेनेचे टीकास्त्र

तेथील नागरिकांच्या समस्या, अडचणी जाणून घेतल्या. दरम्यान, शरद पवार यांच्या दौऱ्यावर “शरद पवारांना आताच जाग आली का?,” असा तिरकस सवाल विचारत चंद्रकांत पाटील यांनी टीका केली होती.

Chandrakant Patil and Sharad Pawar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

निसर्ग चक्रिवादळ (Cyclone Nisarga) संकटामुळे कोकण आणि प्रामुख्याने रायगड परिसरात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या नुकसानग्रस्त परिसराची पाहणी करावयास गेलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका करणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना शिवसेना ( Shiv Sena) मुखपत्र दै. सामना (Saamana Editorial) संपादकीयातून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. कोणी चांगले, महाराष्ट्रहिताचे काम करीत असेल व कोथरुडच्या उपऱ्या पाटलांनी बोंब मारली नाही, असे सहसा घडत नाही. त्यामुळे पवार, ठाकरे बाहेर बडताच सवयीस जागून त्यांनी बोंब मारली, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांना टोला लगावण्यात आला आहे.

'पवार जागेच आहेत! विरोधकांच्या पोटात वादळ' या मथळ्याखाली लिहिलेल्या लेखात शिवसेनेने भाजप आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे.

दै. सामना संपादकीयातील महत्त्वाचे मुद्दे

निसर्ग चक्रिवादळ संकटात झालेल्या नुकसानाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्ष शरद पवार यांनी दौरा करुन पाहणी केली. तेथील नागरिकांच्या समस्या, अडचणी जाणून घेतल्या. दरम्यान, शरद पवार यांच्या दौऱ्यावर “शरद पवारांना आताच जाग आली का?,” असा तिरकस सवाल विचारत चंद्रकांत पाटील यांनी टीका केली होती.