Cyclone Nisarga: निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यातून महाराष्ट्राचे रक्षण करणाऱ्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मानले आभार

निसर्ग चक्रीवादळ (Cyclone Nisarga) ईशान्यकडे सरकले असून मुंबई (Mumbai) असलेला धोका टळला असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

Chief Minister Uddhav Thackeray's (PC - Twitter)

निसर्ग चक्रीवादळ (Cyclone Nisarga) ईशान्यकडे सरकले असून मुंबई (Mumbai) असलेला धोका टळला असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. सध्या निसर्ग चक्रीवादळ तीव्रता कमी झाली आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. ज्यात निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यातून महाराष्ट्राचे रक्षण करणाऱ्यांचे त्यांनी आभार मानले आहेत. मुंबईच्या पूर्वेला महाराष्ट्रातल्या अंतर्गत भागात 90 किलोमीटर अंतरावर हे चक्रीवादळ शमले आहे. हे वादळ पुढे ईशान्यकडे सरकून येत्या 3 तासात त्याचे कमी दाबाच्या पट्यात रुपांतर होणार आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

निसर्ग वादळाच्या पार्श्वभूमीवर महापालिका अधिकारी, जिल्हा प्रशासन, आपात्कालीन व्यवस्थापन, वैद्यकीय पथकांना योग्य ती जबाबदारी पार पाडली आहे. या सर्वांचे उद्धव ठाकरे यांनी मनापासून कौतूक केले आहे. दरम्यान, वृत्तवाहिन्यासुद्धा लोकांना चांगली माहिती देत होत्या. निसर्गापुढे कोणाचेही चालत नाही. पण संकट काळात महाराष्ट्र एक आहे. खंबीर आहे. या वादाळात दिसून आले आहेत. हीच आपली एकजूट महाराष्ट्राला सर्व संकटातून बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. हे देखील वाचा- पुण्यातील खेड तहसील परिसरात भिंत कोसळून 65 वर्षीय महिलेचा मृत्यू, तर कुटुंबातील 5 जण जखमी

उद्धव ठाकरे यांचे निवेदन- 

महाराष्ट्रावर कोरोनाचे संकट घोंघावत असतानाच चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. संकट म्हटले तर, मोठे होते. पण हे संकट आपण सगळ्यांनी परतवून लावले आहे. जनता व प्रशासनाने झुंज दिली व संकटाची तीव्रता कमी केली आहे. दुर्देवाने दोन जीव अपघात गेले कोकणात तसेच इतरत्र नुकसान झाले आहे. या नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश दिले आहे. मुंबा देवीचीच कृपा मुंबईवर आहे. तशी पंढपूरच्या विठु माऊलींचे आशिर्वाद आहेत. मुख्य म्हणजे, या वादळाला थोपवून सामना करणारे महापालिका अधिकारी, जिल्हा प्रशासन, आपत्कालीन व्यवस्थापन, वैदकीय पथके या सगळ्यांचे कौतूक करावे तेवढे थोडेच. वृत्तवाहिन्यासुद्धा लोकांना चांगली माहिती देत आहे.

ट्वीट-

निसर्ग चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका रायगड जिल्ह्यातील नागरिकांना बसला आहे. दरम्यान, अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडीत झाला आहे. तसेच मोबाईल नेटवर्क सेवाही विस्कळीत झाली आहे. याशिवाय राज्यातील अनेक भागात झाडेही उन्मळून पडले आहेत.