IPL Auction 2025 Live

Cyber Fraud: मुंबईकर महिलेने IRCTC च्या Twitter handle वर शेअर केली रेल्वे तिकीटाची माहिती गमावले 64 हजार

त्यामुळे अशाप्रकारे कोणतीही संवेदनशील माहिती अनोळखी व्यक्तीसोबत शेअर करू नका.

Indian Railway | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

सोशल मीडीया हे दुधारी शस्त्र आहे. अनेकजण त्याचा वापर करून जगाच्या कोणत्याही कोपर्‍यातून मदत मागू शकतात, माहिती मिळवू शकतात, आपली तक्रार नोंदवू शकतात. पण ट्वीटर, फेसबूक, इंस्टाग्राम वर अशाप्रकारे माहिती शेअर करताना काळजी घेणं आवश्यक आहे. पोलिसांकडूनही संवेदनशील माहिती जाहीर शेअर करणं टाळा असं आवाहन केलं जातं. लहान वाटणारी ही गोष्ट मोठं नुकसान करू शकते. एका महिलेने 64 हजार रूपये अशाच एका सायबर फ्रॉड (Cyber Fraud) मध्ये गमावल्याची एक घटना समोर आली आहे.

फसवणूक झालेली माहिला ही विले पार्ले भागातील रहिवासी आहे. तिने ट्वीटर वर IRCTC च्या Twitter handle वर तक्रार केल्यानंतर ही फसवणूक झाल्याचं म्हटलं आहे. Times of India च्या रिपोर्ट्सनुसार, MN Meena यांनी 3 भूज ला जाण्यासाठी तिकीटं बूक केली होती. 14 जानेवारीला ती प्रवास करणार आहे. तिला आरएसी मध्ये बुकिंग मिळालं होतं. यामध्ये जर तिकीट बूक केलेल्या व्यक्तीनं तिकीटं रद्द केलं तर आरएसी असलेल्या व्यक्तीला पूर्ण सीट मिळते अन्यथा ती समोरच्या व्यक्तीसोबत शेअर करावी लागते.

RAC tickets कन्फर्म झालं का हे तपासण्यासाठी त्यांनी ट्रेन तिकीटाचे डिटेल्स टाकले. मोबाईल नंबर टाकला. त्यानंतर एक कॉल आला. तिच्या मुलाने तो घेतला. यामध्ये समोरच्या व्यक्तीने आपण customer support executive असल्याचं सांगितलं. आपण एक लिंक शेअर करू तो भरून देण्याचं सांगितलं आणि तिकीट कंफर्म करण्यासाठी 2 रूपये शुल्क भरण्यासही सांगितलं. त्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली. पण त्यानंतर मीनाच्या अकाऊंट मधून 64 हजार गेले.

मीना यांचा नंबर आणि काही माहिती ट्वीटर वर पोस्ट केलेल्या तिकीटावर मिळाली त्यामुळे तिची फसवणूक झाली. त्यामुळे अशाप्रकारे कोणतीही संवेदनशील माहिती अनोळखी व्यक्तीसोबत शेअर करू नका.