Mumbai Cyber Crime News: सायबर क्राईम प्रकरणी 26 वर्षीय मास्टरमाईंड तरुणास अटक,  देशभरातील घोटाळ्यांशी संबंध; मुंबई पोलिसांची कारवाई

धक्कादायक म्हणजे हा तरुण ऑनलाइन शेअरिंग आणि गुंतवणुकीशी संबंधित घोटाळ्याच्या माध्यमातून देशभरातील लोकांची फसवणूक करत असल्याचा आरोप आहे

Arrested | (File Image)

Mumbai Police: मुंबई पोलिसांनी सायबर क्राईम (Mumbai Cyber Crime News) प्रकरणी कारवाई करत एका 26 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे हा तरुण ऑनलाइन शेअरिंग आणि गुंतवणुकीशी संबंधित घोटाळ्याच्या माध्यमातून देशभरातील लोकांची फसवणूक करत असल्याचा आरोप आहे. देशभरातील विविध सायबर घोटाळ्यांशी त्याचा संबंध असल्याचे पुढे आले आहे. रियाजुद्दीन अब्दुल सुभान असे या आरोपीचे नाव आहे. एका 30 वर्षीय व्यवसायिकाची सायबर फसवणूक झाल्याचे प्रकरण नुकतेच पुढे आले होते. या प्रकरणात शोधमोहीम राबवल्यानंतर पलीस आरोपीपर्यंत पोहोचले. त्याला ओशिवारा पोलिसांच्या सायबर सेलने अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी सुभान हा अत्यंत प्राथमिक पातळीवरचा आरोपी आहे तरीही त्याचा विविध गुन्ह्यांतील सहभाग पाहता तो मास्टरमाईंडच्या अगदी जवळचा असावा असा संशय आहे. त्याने आसिफ एंटरप्रायझेस नावाची बनावट कंपनी तयार केली आणि सायबर क्राईम द्वारे मिळवलेले पैसे जमा करण्यासाठी दोन नामांकित बँकांमध्ये चालू खाती (करंट अकाऊंट) उघडली. तपासादरम्यान पोलिसांना आढळून आले की, आसाममधील एका बहुराष्ट्रीय बँकेत असलेल्या एका चालू खात्यात १.१५ कोटी रुपये शिल्लक आहेत, तर दुसरे खाते, वेगळ्या बँकेतील परंतु एकाच फर्मच्या नावावर आहे ज्यात. 1.21 लाख रुपये आहेत. एका नोडल अधिकाऱ्याच्या मदतीने पोलिसांनी कारवाई करत त्याची सर्व बँक खाती गोठविण्यात आली. ज्यामुळे सुमारे 1.36 कोटी रुपयांचे नुकसान टाळले.

पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितमध्ये पुढे आले की, आरोपी सुभान हा त्याच्या एका असममधील साथिदारासह दोन वर्षांपासून घोटाळेबाजांसाठी काम करतो. त्यांनी बोगस कंपन्या स्थापन करुन अनेक बँकांमध्ये खाती उघडली. लोकांची फसवणूक केलेले पैसे ते या खात्यावर जमा करत होते आणि पुढे मास्टरमाईंडला पाठवत होते. ज्यामध्ये या दोघांनाही कमिशन मिळत असे.