Cruise Drug Case: आर्यन खान याच्या बचावासाठी शिवसेना नेत्याची सुप्रीम कोर्टात धाव, NCB च्या भुमिकेवर उपस्थितीत केले प्रश्न
शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी सुप्रीम कोर्टात आर्यन खानच्या समर्थनार्थ एक याचिका दाखल केली आहे.
Cruise Drug Case: मुंबई क्रुजवरील ड्रग्ज पार्टीमध्ये ताब्यात घेण्यात आलेल्या आर्यन खान याच्या बचावासाठी शिवसेना नेता सुप्रीम कोर्टात पोहचले आहेत. शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी सुप्रीम कोर्टात आर्यन खानच्या समर्थनार्थ एक याचिका दाखल केली आहे. या याचिकेत आरोपींच्या मूलभूत अधिकाऱ्यांचा हवाला देत आर्यन खान याला दिलासा देण्याबद्दल सांगण्यात आले आहे. आर्यन खान याच्या जामिनावर 20 ऑक्टोंबरला निर्णय होणार आहे.(Aryan Khan च्या सुटकेसाठी गौरी खानची शपथ, मुलगा घरी येई पर्यंत खाणार नाही गोड)
शिवसेना नेते किशोर तिवारीने सरन्यायाधीश एनवी रमन्ना यांनी या प्रकरणी स्वत: दखल घेण्याची मागणी केली आहे. याचिकेत असे म्हटले आहे की, प्रकरणात सातत्याने आर्यन खानच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होत आहे. शिवसेना नेते यांनी आपल्या याचिकेत पुढे असे लिहिले आहे की, या ड्रग्ज प्रकरणी एनसीबीच्या भुमिकेचा सुद्धा तपास व्हावा. याचिकेत या प्रकरणी न्यायालयीन तपास करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी सुद्धा सातत्याने एनसीबीच्या भुमिकेवर प्रश्न उपस्थितीत करत आहेत.(Cruise Ship Raid Case: एनसीबीचा साक्षीदार किरण गोसाई याच्या विरोधात लूकआउट नोटीस जारी)
सध्या आर्यन खान याला आर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात आले आहे. त्याच्या वकिलांनी मुंबईतील सेशंस कोर्टात जामिन अर्ज दाखल केला होता. त्यावर सुनावणी झाली आहे. तर कोर्टाने आपला निर्णय 20 ऑक्टोंबर पर्यंत राखून ठेवला आहे. क्रुज पार्टी ड्रग्ज प्रकरणी मुनमुन धमेचा, अरबाज मर्चेंट, नूपुर सारिका, इसमीत सिंह, मोहक जसवाल, विक्रांत छोकर आणि गोमित चोपडा यांना अटक केली होती. त्यांच्या विरोधात एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.