'राज्यात विकासापेक्षा गुन्हेगारीचे प्रमाण अधिक'; Ajit Pawar यांची एकनाथ शिंदे सरकारवर टीका

हे सरकार राज्याच्या सामाजिक बांधणीला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

Ajit Pawar | (Photo Credit: Facebook)

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शुक्रवारी महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे सरकारवर हल्लाबोल केला. पवार म्हणाले की, शिंदे-फडणवीस सरकारच्या राजवटीत विकासापेक्षा गुन्हेगारीचे प्रमाण अधिक आहे. राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर विरोधी पक्षाने गेल्या आठवड्यात मांडलेल्या ठरावावर विधानसभेत चर्चेला सुरुवात करताना, विरोधी पक्षनेते असलेले पवार म्हणाले की, ‘डबल इंजिन’ सरकार सत्तेत राहण्यासाठी तडजोडी करत आहे. भारतीय जनता पक्ष राज्यांतील पक्षाच्या किंवा त्याच्या मित्रपक्षांच्या सरकारांना ‘डबल इंजिन’ डिस्पेंसेशन म्हणून संबोधतो, याचा अर्थ संबंधित राज्य तसेच केंद्राच्या प्रयत्नांतून होणारा विकास.

पवार म्हणाले की, नैसर्गिक आपत्ती, तसेच पिकांना किमान आधारभूत किंमत न मिळाल्याने शेतकरी त्रस्त आहेत, बेरोजगारी वाढत आहे, विशेषत: महिलांवरील गुन्हेगारी वाढत आहे, अशात सरकार राजकीय प्रतिस्पर्ध्यांवर दबाव आणण्यात आणि छळण्यात व्यस्त आहे. ‘लव्ह जिहाद’च्या निमित्ताने राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप राष्ट्रवादीच्या नेत्याने केला. ‘लव्ह जिहाद’ हा शब्द प्रामुख्याने उजव्या विचारसरणीच्या संघटना वापरतात. ज्याद्वारे त्यांचा आरोप आहे की, मुस्लिम पुरुष हिंदू महिलांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांचे धर्मांतर करत आहेत. (हेही वाचा: Uddhav Thackeray यांचे Raj Thackeray यांना प्रत्युत्तर, म्हणाले - ते मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपटातील पात्रासारखे)

काँग्रेसचे नाना पटोले आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही शिंदे सरकारवर निशाणा साधला. हे सरकार राज्याच्या सामाजिक बांधणीला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. दुसरीकडे, अपक्ष आमदार रवी राणा म्हणाले की, मागील महाविकास आघाडी सरकारने कायदा व सुव्यवस्थेची चेष्टा केली होती, तर सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारीत असलेले गृह खाते कार्यक्षमतेने काम करत आहे.