Covid-19 Vaccination in Thane: ठाण्यातील काही लसीकरण केंद्र आज बंद; येथे पहा संपूर्ण यादी

त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढवणे गरजेचे आहे. मात्र अद्याप काही ठिकाणी लसीकरणाला ब्रेक लागताना दिसत आहे. आज ठाणे शहारातील काही लसीकरण केंद्र बंद राहणार आहेत.

Covid-19 Vaccination | Representational image (Photo credits: Pixabay)

कोविड-19 (Covid-19) संकटावर मात करण्यासाठी लसीकरण (Vaccination) हा एकमेव उपाय आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढवणे गरजेचे आहे. मात्र अद्याप काही ठिकाणी लसीकरणाला ब्रेक लागताना दिसत आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, आज ठाणे (Thane) शहारातील काही लसीकरण केंद्र बंद राहणार आहेत. या लसीकरण केंद्रावर गर्भवती महिला आणि लहान मुले यांच्यासाठी आरोग्य शिबिरं आयोजित करण्यात आल्याने या केंद्रांवर आज लसी मिळणार नाही, असे ठाणे महानगरपालिकेने (Thane Municipal Corporation) सांगितले आहे.

आज केवळ तीन सेंटर्सवर लसीकरण सुरु असून ऑनलाईन स्लॉट बुकिंग पद्धतीने नागरिकांना लसीचा डोस मिळू शकतो. तर इतर सर्व केंद्रांवर आरोग्य शिबिर सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत सुरु राहणार आहे. (Mumbai: विक्रोळी येथे सेंट जोसेफ शाळेमध्ये तृतीयपंथीयांसह LGBT नागरिकांसाठी विशेष कोविड-19 लसीकरण केंद्र सुरु)

आज लसीकरण होणार नसलेल्या ठाणे महानगरपालिका हद्दीमधील केंद्र:

# आनंद हेल्थ सेंटर

# आझाद नगर हेल्थ सेंटर

# सीआर वाडीया हॉस्पिटल

# गांधी नगर हेल्थ सेंटर

# काजूवाडी हेल्थ सेंटर

# खारेगाव हेल्थ सेंटर

# किशन नगर हेल्थ सेंटर

# कोपरी मॅटरनिटी हॉस्पिटल

# कोपरी हेल्थ सेंटर

# माजीवाडा हेल्थ सेंटर

# मनोरमा नगर हेल्थ सेंटर

# मानपाडा हेल्थ सेंटर

# नौपाडा हेल्थ सेंटर

# उथळसर हेल्थ सेंटर

# वर्तकनगर हेल्थ सेंटर

# सावरकरनगर हेल्थ सेंटर

# लक्ष्मी चिराग नगर हेल्थ सेंटर

कोवॅक्सिनचा पहिला आणि दुसरा डोस तीन केंद्रांमध्ये देण्यात येईल, यामध्ये टीएमसी ठाणे ग्लोबल हब 1, टीएमसी ठाणे ग्लोबल हब 2 आणि टीएमसी पोस्ट कोविड सेंटर 2 येथे देण्यात येणार आहे. यापैकी टीएमसी पोस्ट कोविड सेंटर 2 मध्ये ऑनलाईन स्लॉट बुकिंगची गरज नसून येथे फक्त दुसरा डोस देण्यात येणार आहे.