ठाण्यात COVID19 चा प्रादुर्भाव वाढत असल्याने कोरोनामुक्त झालेल्या नर्सला इमारतीमधील रहिवाशांनी प्रवेशासाठी नाकारले

या नर्सने कोरोनावर मात केल्यानंतर घरी आल्यानंतर त्याला जवळजवळ 6 तास घराबाहेर ठेवण्यात ही आले.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: PTI)

ठाण्यात कोरोनामुक्त झालेल्या पुरुष नर्सला इमारतीमधील रहिवाशांनी प्रवेश देण्यासाठी नाकारल्याचा प्रकार समोर आला आहे. या नर्सने कोरोनावर मात केल्यानंतर घरी आल्यानंतर त्याला जवळजवळ 6 तास घराबाहेर ठेवण्यात ही आले. त्याचसोबत नर्ससह त्याचा सोबत राहणाऱ्यांना इमारतीमधील घर पंधरा दिवसात खाली करण्याचा अर्ज दिल्यानंतर त्यांना रुममध्ये प्रवेश देण्यात आला. याच पाचपैकी तीन जणांची सुद्धा कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. या तीन जणांवर उपचार सुरु असून आहेत. तर अन्य दोन जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.

सदर नर्स हा घोडबंदर येथील एका इमारतीत राहत असून ठाण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे असे रहिवाशांनी सांगितले. त्यामुळे या नर्सची इमारतीमधील उपस्थितीती ही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास मदत करेल असे ही इमारतीच्या रहिवाशांनी त्याला कारण दिले आहे. ज्या खासगी रुग्णालयात नर्स कार्यरत आहे त्याच्या हॉस्पिटलमधील लोकांनी इमारतीचा 12 वा मजला सॅनिटाइज केल्यानंतर त्याला घरात जाण्यास परवानगी देण्यात आली.(Coronavirus Update: तुमच्या जिल्ह्यात किती कोरोना रुग्ण? महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी पहा)

हाउसिंग सोसायटी मधील रहिवाशांनी कोरोनाची लागण झालेल्यांनी स्वच्छता राखण्यास अपयशी ठरल्याचा आरोप केला आहे. तर सदर नर्सने असे म्हटले की, रहिवाशांना माझा त्रास होत आहे असे सांगण्यात आले. परंतु कोरोनावर उपचार घेतल्यानंतर अशक्तपणा वाटत असल्याने पाणी किंवा खाणे तरी द्यावे अशी त्याने विनंती ही केली.रहिवाश्यांनी पुढे असे ही म्हटले आहे की, या सहा जणांना सांगून सुद्धा त्यांनी नियमाचे उल्लंघन केले. तसेच कोरोनाच्या काळात सुरक्षिततेच्या नियम सुद्धा पाळलेले नाहीत. हे सर्वजण वापरलेले मास्क सुद्धा रुममधून फेकत असल्याचे ही रहिवांशी म्हटले आहे. या सर्वांना वारंवार वॉर्न सुद्धा करण्यात आले होते.