COVID 19 मुळे मृत्यू झाल्यास कोणत्याही धर्माच्या रुग्णाच्या शवाचे दहनच होणार; BMC आयुक्त प्रवीण परदेशी यांचे आदेश

मुंबई महानगरपालिका आयुक्त (BMC Commissioner) प्रवीण परदेशी (Pravin Pardeshi) यांनी अधिकृत घोषणा केली असून यापुढे कोणत्याही धर्मच्या कोरोना रुग्णाचा जर का मृत्यू झाला तर त्याच्या शवाचे दहाचं केले जाईल असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Death | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) देशभरात आतापर्यंत तब्बल 30 हुन अधिक मृत्यू झाले आहेत. दिवसागणिक हा व्हायरस आपले हात पाय पसरतच चालला आहे. यातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या जरी दिलासादायक असली तरी रुग्णांचे वाढते आकडे देखील तितकेच धक्कादायक आहेत. अलीकडेच निदर्शनात आलेल्या एका घटनेनुसार, कोरोनाचा व्हायरस हा जिवंत माणसाच्या इतकाच त्या व्यक्तीच्या मृतदेहातून सुद्धा पसरू शकतो असे दिसून आले आहे. त्यामुळे कोणतीही रिस्क न घेता कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या शरीरावर अंत्यसंस्कार हे दहन करूनच केले जातील असे फर्मान काढण्यात आले आहे. याविषयी मुंबई महानगरपालिका आयुक्त (BMC Commissioner) प्रवीण परदेशी (Pravin Pardeshi) यांनी अधिकृत घोषणा केली असून यापुढे कोणत्याही धर्मच्या कोरोना रुग्णाचा जर का मृत्यू झाला तर त्याच्या शवाचे दहाचं केले जाईल असे स्पष्ट करण्यात आले आहे. Coronavirus Update in Mumbai: कोविड-19 चे नवे 47 रुग्ण, मुंबईत कोरोना बाधितांचा आकडा 170 वर

वास्तविक काही धर्मात मृत शरीर पुरण्याची रीत आहे , मात्र असे केल्यास हा व्हायरस जमिनीच्या मार्फत किडे कीटकांत जाऊन पुढे पुन्हा पसरू शकतो. त्यामुळे सुरक्षित पर्याय म्हणून कोरोना बाधित रुग्णाचे मृत शरीर यापुढे दहनच केले जाणार आहे. या मृत शरीराला त्याचे कुटुंबीय किंवा जवळची मंडळी केवळ पाहू शकतील, हात लावणे किंवा अन्य कोणताही स्पर्श करण्याची परवनागी दिली जाणार नाही. तसेच या अंत्ययात्रेत 5 हुन अधिक जण एकत्र येऊ शकणार नाहीत असेही सांगण्यात आले आहे.

ANI ट्विट

दरम्यान, काही दिवसांपूर्वी वेस्ट मिडलँड येथील एका ताज्या घटनेत एका कोरोना मृत महिलेच्या शरीरावर अंत्यसंकसार करून येताना तब्बल 17 जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचे उघड झाले होते. त्यामुळे आता मृत शरीरातून सुद्धा कोरोना पसरू शकतो अशा चर्चा आहेत. दुसरीकडे देशात कोरोना रुग्णांची संख्या आता 1000च्या वर पोहचली आहे.