US मध्ये कोविड लस घेतलेलं वृद्ध जोडपं मुंबईत लोकल प्रवासासाठी पासच्या प्रतिक्षेत
अॅंजेला फर्नांडीस (65) आणि त्यांचे पती अमेरिकेत असताना ते मॉर्डना लस घेऊन देशात परतले आहेत पण त्यांना मुंबई लोकल मध्ये प्रवेश नाकारला जात आहे.
मुंबईतील बोरिवली (Borivali) भागात एक वयोवृद्ध जोडपं सध्या अमेरिकेतून (USA) लस घेऊन आल्याने मुंबईत रेल्वे पास (Mumbai Local Pass) मिळवण्याच्या प्रतिक्षेमध्ये आहे. या जोडप्याचे दोन्ही डोस अमेरिकेत झाल्याने भारतात कोविड 19 वॅक्सिनचे रेकॉर्ड ठेवणार्या को विन वर त्यांचे रेकॉर्ड नसल्याने आता त्यांना मुंबईत रेल्वे मिळण्यासाठी प्रतिक्षा करावी लागत आहे.
सध्या मुंबई लोकलने प्रवास करण्यासाठी तिकीट दिले जात नाही. लोकांना रेल्वे पास दिला जात आहे. या पासच्या आधारे ते महिनाभर प्रवास करू शकतात पण रेल्वे प्रशासनाला अद्याप देशाबाहेरील लसींबाबत मंजुरीच्या लसीची कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही. नक्की वाचा: Mumbai Local Monthly Pass: पात्र नागरिकांना उद्या, 11 ऑगस्ट पासून मिळणार मासिक रेल्वे पास; जाणून घ्या वेळा, कागदपत्रे व प्रक्रिया.
अॅंजेला फर्नांडीस (65) आणि त्यांचे पती फेब्रुवारी 2020 मध्ये अमेरिकेला गेले होते. त्यानंतर दिवसागणिक मुंबई आणि अमेरिकेमध्ये कोविड परिस्थिती भीषण होत गेल्याने त्यांनी भारतात परतण्याचा प्लॅन लांबणीवर टाकला. अशातच अमेरिकेतून भारतात परत येण्यापूर्वी त्यांनी लस घेऊन येण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेत त्यांनी 28 दिवसांच्या फरकाने 'मॉर्डना' लसीचे दोन्ही डोस घेतले.
सप्टेंबर महिन्यात भारतात परतल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा रेल्वे पाससाठी अर्ज केला पण तेव्हा संबंधितांनी कोविन पोर्टल वरील लस घेतल्याचं सर्टिफिकेट सादर करण्याचा नियम सांगत पास नाकारला. सध्या त्यांना बोरिवली ते वडाळा असा प्रवास ओला, उबर कॅब ने करावा लागत आहे. यामध्य्ये वेळ तर लागतोच पण त्यांना ब्लॅडर कंट्रोलचा त्रास असल्याने हे त्रासदायक देखील ठरत आहे.
TOI शी बोलताना, पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क अधिकार्याने दिलेल्या माहितीनुसार, पास सध्या बीएमसीच्या नियमावलीनुसार दिले जात आहेत. स्टेट पोर्टलवर त्याची नोंद आवश्यक आहे पण या जोडप्याचा प्रश्न बरोबर असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. तर बीएमसीच्या Dr Mangala Gomare यांनी दिलेल्या माहितीनुसार ते राज्य आणि केंद्र सरकार सोबत अशा अपवादात्मक स्थितीत काय करावं? याबाबत विचार विनिमय करत आहेत.