Coronavirus Vaccination: केंद्र शासनाच्या सूचनेनुसार राज्यात लसींचे वितरण; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याला किती मिळाले डोस
16 जानेवारीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशव्यापी लसीकरणाचा शुभारंभ करण्यात येणार असून जालना जिल्हा रुग्णालय आणि मुंबईतील कूपर रुग्णालय या दोन ठिकाणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून प्रधानमंत्री संवाद साधतील
देशात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला (Coronavirus Vaccination) सुरुवात होत आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली सर्व राज्यांना लसींचा पुरवठा करण्यात येत आहे. महाराष्ट्रालाही त कोरोना लसीकरणासाठी केंद्र शासनाकडून लस पुरवठा करण्यात आला असून, त्यांच्या निर्देशनुसार सर्व जिल्ह्यांना लस वाटप केले जात आहे. दरम्यान केंद्र शासनाने राज्यातील लसीकरण केंद्रांची संख्या सुधारित केली असून आता 358 केंद्रांच्या माध्यमातून लस देण्यात येणार आहे. मुंबईसाठी 1 लाख 39 हजार 500 तर पुण्यासाठी 1 लाख 13 हजार डोस वितरण करण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
महाराष्ट्रात सुमारे 8 लाख आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली असून त्यांना पहिल्या टप्प्यात लसीकरण केले जाणार आहे. राज्यातील 358 केंद्रांच्या माध्यमातून पहिल्या दिवशी सुमारे 35 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात येईल.
महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यात 9 लाख 63 हजार लशींचे वितरण करण्यात आले आहे. त्यामध्ये अकोला जिल्ह्यात 9 हजार डोस, अमरावतीसाठी 17 हजार, औरंगाबाद-34 हजार, बीड-18 हजार, बुलढाणा-19 हजार, धुळे-12 हजार 500, गडचिरोली 12 हजार, गोंदिया 10 हजार, हिंगाली 6 हजार 500, जळगाव-24 हजार 500, लातूर-21 हजार, नागपूर-42 हजार, नांदेड-17 हजार, नंदुरबार-12 हजार 500, नाशिक-43 हजार 500, मुंबई-1 लाख 39 हजार 500, उस्मानाबाद-10 हजार, परभणी-9 हजार 500, पुणे-1 लाख 13 हजार, रत्नागिरी-16 हजार, सांगली-32 हजार, सातारा-30 हजार, सिंधुदुर्ग-10 हजार 500, सोलापूर-34 हजार, वर्धा-20 हजार 500, यवतमाळ-18 हजार 500, अहमदनगर-39 हजार, भंडारा-9 हजार 500, चंद्रपूर-20 हजार, जालना-14 हजार 500, कोल्हापूर-37 हजार 500, पालघर-19 हजार 500, रायगड-9 हजार 500, ठाणे-74 हजार, वाशिम-6 हजार 500 अशा प्रकारे वाटप करण्यात आले आहे. (हेही वाचा: Rajesh Tope on COVID19 Vaccine: लसीकरणाच्या मोहिमेत 'या' लोकांना लस दिली जाणार नाही, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती)
16 जानेवारीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशव्यापी लसीकरणाचा शुभारंभ करण्यात येणार असून जालना जिल्हा रुग्णालय आणि मुंबईतील कूपर रुग्णालय या दोन ठिकाणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून प्रधानमंत्री संवाद साधतील, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.