Coronavirus: दिल्लीतील निजामुद्दीन मरकज कार्यक्रमाला उपस्थिती लावलेल्या पुण्यातील 60 नागरिकांना क्वारंटाइनचा सल्ला
या कार्यक्रमाला पुण्यातील काही नागरिकांनी उपस्थिती लावली होती. त्यानुसार जवळजवळ 60 जणांचा क्वारंटाइचा सल्ला देण्यात आला आहे.
देशभरात कोरोना व्हायरसने (Coronavirus) थैमान घातले असून त्यांचा बाधितांचा आकडा 1397 वर पोहचला आहे. तसेच कोरोनामुळे बळींची संख्या 44 वर गेली असल्याने ही गंभीर बाब आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वत:ची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे. येत्या 14 एप्रिल पर्यंत लॉकडाउनचे आदेश दिले आहे. त्यामुळे नागरिकांना घरीच थांबण्याचे सांगण्यात येत आहे. तरीही नागरिक काही ना काही कारणाने घराबाहेर पडत आहे. यामुळे पोलिसांना थेट कारवाई करावी लागत आहे. याच पार्श्वभुमीवर दिल्लीत निजामुद्दीन मरकज कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला पुण्यातील काही नागरिकांनी उपस्थिती लावली होती. त्यानुसार जवळजवळ 60 जणांचा क्वारंटाइचा सल्ला देण्यात आला आहे.
दिल्लीतील तबलीगी जमातीकडून निजामुद्दीन मरकज कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले हो्ते. या कार्यक्रमाला विविध राज्यातील मंडळींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. तर महाराष्ट्रातील मंडळी या कार्यक्रमाला हजर होते. पण कोरोनाच्या पार्श्वभुमीवर गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे असे असताना सुद्धा कार्यक्रमाला उपस्थिती लावणे ही एक संतापजनक गोष्ट आहे. परंतु तरीही नागरिकांना उपस्थिती लावल्याचे दिसून आले. यामुळे पुण्यातील 60 जणांना क्वारंटाइनचा सल्ला दिला आहे. पण या नागरिकांची कोरोनाची चाचणी किंवा त्या संबंधित लक्षण दिसून आली नसल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली आहे. तसेच सांगली येथील 3 जणांची सुद्धा कार्यक्रमाला उपस्थितील असल्याने क्वारंटाइनचा सल्ला दिला आहे.(Coronavirus: तुमच्या जिल्ह्यात कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या किती? महाराष्ट्रात सद्यास्थिती काय? घ्या जाणून)
दरम्यान, या कार्यक्रमला उपस्थिती लावणारे नागरिक किती होते आणि त्यांना कोरोनाची लागण झाली आहे का हे तपासून पहाणे आव्हानत्मक असणार आहे. तसेच तमिळनाडू येथील जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा राज्यातील निजामुद्दीन कार्यक्रमाला उपस्थिती लावलेल्या मुस्लिमांनी पुढे यावे असे स्पष्ट केले आहे.