Coronavirus: सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात आढळलेला पहिला रुग्ण कोरोनामुक्त
कोरोना विषाणू विरुद्धच्या लढाईत केंद्र व राज्य सरकारकडून महत्वपूर्ण पावले उचलली जात आहेत. महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना विषाणू अधिक वेगाने पसरत चालत असल्यामुळे नागरिकांमध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे.
कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण जगभरात हाहाकार मजावला आहे. कोरोना विषाणू विरुद्धच्या लढाईत केंद्र व राज्य सरकारकडून महत्वपूर्ण पावले उचलली जात आहेत. महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना विषाणू अधिक वेगाने पसरत चालत असल्यामुळे नागरिकांमध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. यातच सातरा (Satara) जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्ण कराड (Karad) तालुक्यात कोरोना पहिला रुग्ण आढळून आला होता. यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. मात्र, या रुग्णांची कोरोना विषाणूच्या जाळ्यातून सुटका झाली आहे. या रुग्णाचे दोन्ही रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे त्याला डिस्चार्ज देण्यात आला. यानंतर रुग्णाला टाळ्यांच्या गजरात रुग्णालयातून निरोप देण्यात आला.
राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. तर दुसरीकडे कोरोना विषाणूंपासून मुक्त होणाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे. सातारामध्ये गेल्या काही दिवसांपूर्ण कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. यामुळे त्याला कराडमधील कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून गेल्या काही दिवसांपासून त्याच्यावर उपचार सरु होते. मात्र, संबंधित रुग्णाची दोन्ही अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत. यामुळे त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या रुग्णाने कोरोनाविरोधातील लढ्यात सहकार्य करण्याची तयारी दाखवली आहे. या व्यक्तीने प्लाझमा उपचारासाठी रक्तदान करण्याची तयारीही दर्शवली आहे. त्यामुळे सर्व रुग्णालय प्रशासनाने त्यांचे आभार मानले आहेत. हे देखील वाचा- मुंबई: मानखुर्द मधील Containment Area मध्ये भाजी विक्री करत असल्याने महिला आणि पोलिसात जुंपली (Watch Video)
महाराष्ट्रात गेल्या 2 दिवसांपासून कोरोबाधित रुग्णांच्या संख्येत साकात्मक बदल घडून आले आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यात कोरोनाच्या नॉन-हॉटस्पॉट ठिकाणी येत्या 20 एप्रिल पासून आरोग्य, शेती आणि बागकाम, नारळ, काजू आणि मसाल्याची शेती, पशुसंवर्धन शेती, बँकेच्या शाखा, एटीएम, ई-कॉमर्स कंपन्या सुरु करण्यात येणार आहेत. मात्र, या सेवा सुरु करण्यासाठी संबंधित व्यक्तीला राज्य सरकारच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. तसेच या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या इसमावर योग्य ती कारावाई केली जाणार आहे.