Coronavirus Test in Mumbai: घरबसल्या COVID 19 ची चाचणी करण्यासाठी ICMR ने दिली खाजगी लॅब्सला परवानगी; इथे पहा Diagnostic Centres ची नावं आणि नंबर 

याच पार्श्वभुमीवर मुंबई महापालिकेने खासगी रुग्णालयांना कोरोनाची चाचणी घरुन करणाऱ्यांचे नुमने जमा करण्याची परवानगी दिली आहे. तसेच महापालिकेने यासंदर्भात ट्वीट करत काही खासगी तपासणी केंद्रांचे क्रमांक जाहीर केले आहेत.

Coronavirus in India | Representational Image (Photo Credits: PTI)

राज्यातील कोरोना व्हायरसची परिस्थिती पाहता रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. याच पार्श्वभुमीवर मुंबई महापालिकेने खासगी रुग्णालयांना कोरोनाची चाचणी घरुन करणाऱ्यांचे नुमने जमा करण्याची परवानगी दिली आहे. तसेच महापालिकेने यासंदर्भात ट्वीट करत काही खासगी तपासणी केंद्रांचे क्रमांक जाहीर केले आहेत. त्यानुसार मेट्रोपोलिस, थायरोकेअर, सबर्बन डायग्नोस्टिक्स, सर एचएन रिलायन्स आणि एसएलआर या तपासणी केंद्रांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे. या सर्व तपासणी केंद्रे आयसीएमआर (ICMR) अधिकृत असून कोरोनाची चाचणी करण्याऱ्यांचे नमुने जमा करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

न्यूमोनियासारखे लक्षण असलेल्या लोकांना प्राधान्य दिले जाणार आहे. त्यानुसार कफ, ताप, खोकला किंवा श्वसनासंदर्भातील रुग्णांकडे प्रथम लक्ष दिले जाणार आहे. मेट्रोपोलिस यांच्यासोबत संपर्क साधण्यासाठी-8422801801 क्रमांक, थायरोकेअरसाठी 9702466333, सबर्बन डायग्नोस्टिक्ससाठी 022-61700019 आणि एचएन रिलायन्ससाठी 9820043966 क्रमांक नागरिकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. तर चाचणीसाठी साडेचार हजारांपेक्षा अधिक शुल्क आकारले जाणार नसल्याचे ही स्पष्ट करण्यात आले आहे.(Coronavirus: आता मुंबईमधील लोक घरीच करू शकणार कोरोना विषाणूची चाचणी; BMC सुरु करत आहे नवीन उपक्रम)

यापूर्वी केवळ लक्षणात्मक संशयितांचे नमुने आणि त्यांच्या जवळच्या संपर्कांची तपासणी केली गेली. आता, आयसीएमआरने असंवेदनशील असलेल्यांना चाचण्या वाढवल्या आहेत. तपासणी केंद्राने एफडीए मंजूर किट्स वापरण्यास परवानगी असून त्यांची किंमत 4500 रुपये आहे. दरम्यान, महाराष्ट्रात सहा नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 107 वर पोहचला आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी राज्यात संचारबंदी लागू करण्यात येणार असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. अत्यावश्यक सेवासुविधा वगळता अन्य गोष्टी बंद राहणार असल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif