महाराष्ट्रात एकाच दिवसात 413 कोरोनाबाधित रुग्णांचा बळी, एकूण मृतांचा आकडा 19 हजारांच्या पार

यामुळे राज्यातील एकूण कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 19,063 वर पोहचला आहे. यापूर्वी 9 ऑगस्टला 390 रुग्णांनी आपला जीव गमावला होता

Coronavirus (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रात (Maharashtra) गुरुवारी जवळजवळ 413 कोरोनाबाधित रुग्णांचा एकाच दिवशी बळी गेला असल्याने हा आकडा आतापर्यंतचा सर्वाधिक आहे. यामुळे राज्यातील एकूण कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 19,063 वर पोहचला आहे. यापूर्वी 9 ऑगस्टला 390 रुग्णांनी आपला जीव गमावला होता. गुरुवारी झालेल्या मृतांची आकडेवारी पाहता 413 पैकी 288 जणांचा 48 तासात मृत्यू झाला. तर 74 जणांचा गेल्या आठवड्यात आणि 74 जणांनी यापूर्वी आपला जीव गमावला होता. राज्यात आणखी 11,813 रुग्ण आढळून आले असल्याने कोरोनाबाधितांचा आकडा 5,60,126 वर पोहचला.

मुंबईत गुरुवारी 1,200 रुग्णांची भर पडल्याचे दिसून आले. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 1,27,556 वर पोहचला असून 48 जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील एकूण बळींचा आकडा 6991 वर गेला आहे. जो आता 7 हजारांच्या नजीकच पोहचला आहे. एका वरिष्ठ नागरी अधिकाऱ्यांनी असे म्हटले आहे की, शहरात दिवसाला 9 हजार कोरोनाच्या चाचण्या करण्यात येतात.(Coronavirus in Maharashtra: मुंबई, पुणे, कोल्हापूर, रत्नागिरीसह महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यात किती आहेत कोरोनाचे रुग्ण?)

पुण्यात काल कोरोनाचे सर्वाधिक म्हणजेच 3034 रुग्ण आणि 118 जणांचा मृत्य झाला आहे. राज्यातील कोरोनाबाधितांचा मृत्यूदर हा 3.4 टक्के असून मुंबईत मृ्त्यूदर 5.5 टक्के आहे. मुंबई मेट्रोपोलिटन रिजन, कल्याण-डोंबिवलीत 330 नवे रुग्ण आणि 9 जणांचा गुरुवारी बळी गेला आहे. यामुळे येथील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 23,547 वर पोहचला असून 475 जणांनी आपला कोरोनामुळे जीव गमावला आहे. त्याचसोबत कल्याण-डोंबिवलीतील 309 जणांना काल डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण 18,870 जणांची प्रकृती येथे सुधारली असून 4202 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

कल्याण-डोंबिवली महापालिकेने गुरुवारी 'मिशन झिरो' हे कोरोनाबाधित रुग्णांसाठी कॅम्पेन सुरु केले आहे. त्यानुसार नागरी अधिकाऱ्यांसह एनजिओच्या मदतीने हे कॅम्पेन राबवले जाणार आहे. त्याचसोबत भारतीय जैन संघ आणि एमसीएचआय-कल्याण यांनी 10 अशा गाड्या लॉन्च केल्या आहेत ज्या नागरिकांच्या दारोदारी जाऊन जास्तीत जास्त अँन्टिजेन टेस्ट करणार आहेत.(मुंबईत कोरोनाबाधितांसह मलेरियाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ)

नवी मुंबईतील महापालिकेच्या क्षेत्रात 317 कोरोनाग्रस्त आढळल्यानंतर येथील आकडा 19,757 वर पोहचला आहे. त्यापैकी 15,768 जणांची प्रकृती सुधारली आहे. नवी मुंबई महापालिकेने असे म्हटले आहे की, सात जणांचा गुरुवारी मृत्यू झाल्याने आकडा 493 वर पोहचला आहे. तर पनवेल महापालिकेने 189 रुग्णांची नोंद झाली असून 10 जणांना बळी गेल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे पनवेल शहरात एकूण 8733 कोरोनाबाधित रुग्ण असून 215 जणांचा मृत्यू झाला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif