पुणे येथे 41 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याने बळींचा आकडा 61 वर- आरोग्य विभाग

त्यामुळे आतापर्यंत पुण्यात कोरोनामुळे बळींची संख्या 61 वर पोहचला आहे. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून मृतांच्या आकड्यात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तरीही नागरिक लॉकडाउनच्या नियमाचे उल्लंघन करत असल्याचे दिसून येत आहेत.

Coronavirus | Representational Image| (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 5 हजाराच्या पार गेला आहे. तर मुंबई (Mumbai) आणि पुण्यात (Pune) कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आल्याने त्यांची रेड झोनमध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्यासह मृतांची संख्या सुद्धा वाढत आहे. याच पार्श्वभुमीवर आता पुण्यातील एका कोरोनाबाधित 41 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत पुण्यात कोरोनामुळे बळींची संख्या 61 वर पोहचला आहे. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून मृतांच्या आकड्यात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तरीही नागरिक लॉकडाउनच्या नियमाचे उल्लंघन करत असल्याचे दिसून येत आहेत.

पुण्यात 21 एप्रिल रोजी ससून रुग्णालयात उपचारादरम्यान गंजपेठेतील 50 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. या महिलेला 19 एप्रिल रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आल्यानंतर त्यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर आता एका 41 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 700 च्या पार गेली आहे. तर गेल्या काही दिवसांपूर्वी नागरिक सकाळच्या वेळेस मॉर्निंग वॉकसाठी आले असता पोलिसांनी त्यांना अद्दल घडवल्याचे दिसून आले होते. (Coronavirus: पुण्यातील 92 वर्षीय आजींची कोरोनावर मात, परिवारातील अन्य 4 जणांची चाचणी निगेटिव्ह आल्याने डिस्चार्ज)

दरम्यान, राज्याची रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे. त्यानुसार ऑरेंज आणि ग्रीन झोनमधील लॉकडाउनचे काही नियम शिथिल करण्यात आली आहे. तसेच नागरिकांनी कोरोनाची परिस्थिती पाहता घरातच थांबावे असे वारंवार आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे. तसेच देशभरात येत्या 3 मे पर्यंत लॉकडाउन कायम राहणार आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif