Coronavirus: पुणे ते परभणी तब्बल 350 किमी पायी चालत गेलेल्या व्यक्तीची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह
यामध्ये मुंबई (Mumbai) आणि पुण्यात (Pune) बहुतांश कोरोनाचे रुग्ण आहेत. राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता लॉकडाउनचे आदेश पुढील काही दिवस वाढवण्यात आले आहेत.
महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधित (Coronavirus) रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये मुंबई (Mumbai) आणि पुण्यात (Pune) बहुतांश कोरोनाचे रुग्ण आहेत. राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता लॉकडाउनचे आदेश पुढील काही दिवस वाढवण्यात आले आहेत. यामुळे बहुसंख्येने कामगार वर्गाने पायी चालत जाण्याचा निर्णय घेतला आहे. याच दरम्यान, पुणे ते परभणी (Parbhani) तब्बल 350 किमी पायी चालत गेलेल्या एका व्यक्तीची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. गुरुवारी परभणी जिल्हात पहिलाच कोरोनाचा रुग्ण आढळून आल्याचे समोर आले. याबाबतची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
पुणे येथून पायी चालत आलेल्या 21 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. या व्यक्तीने तब्बल 350 किमी चालत प्रवास केल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. कोरोनाची लागण झालेल्या या व्यक्तीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. व्यक्तीची कोरोनाची चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली. सध्या या व्यक्तीची प्रकृती ठिक असून त्याच्या संदर्भात आलेल्या 8-9 जणांचा तपास करण्यात आला आहे.(पुणे येथे कोरोनामुळे 44 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू,बळींची संख्या 49 वर पोहचली)
दरम्यान, महाराष्ट्र राज्याची तीन झोन मध्ये विभागणी करण्यात आली आहे. कोरोना रुग्णसंख्येनुसार ही विभागणी करण्यात येणार आहे. 15 पेक्षा अधिक रुग्ण असलेल्या जिल्हे रेड झोन , 15 पेक्षा कमी रुग्ण असलेले जिल्हे ऑरेंज आणि एकही रुग्ण नसलेले जिल्हे ग्रीन झोन मध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. लॉकडाऊन संदर्भात कोणतेही नियम रेड झोनमधील जिल्ह्यांमध्ये शिथिल केले जाणार नाही असे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.