Coronavirus: चिंताजनक! अंधेरी-जोगेश्वरी कोरोनाचे नवे हॉटस्पॉट; एका दिवसात 166 नवे रुग्णांची नोंद
राज्यात सर्वाधिक रुग्ण मुंबई आणि पुणे परिसरात आढळून आहेत. यातच अंधेरी- जोगेश्वरी (Andheri-Jogeshwari) येथही दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे.
महाराष्ट्रात कोरोनाचे (Coronavirus) जाळे अधिक वेगाने पसरत चालले आहे. राज्यात सर्वाधिक रुग्ण मुंबई आणि पुणे परिसरात आढळून आहेत. यातच अंधेरी- जोगेश्वरी (Andheri-Jogeshwari) येथही दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. अंधेरी पूर्व आणि जोगेश्वरीचा समावेश असलेल्या के पूर्व वॉर्डात मुंबईतील सर्वाधिक 3 हजार 782 रुग्ण आढळून आले आहेत. शनिवारपर्यंत दादर, धारावी आणि माहिमचा समावेश असलेला जी उत्तर विभागात सर्वाधिक रुग्ण होते. मात्र, शनिवारी एका दिवसात अंधेरी आणि जोगेश्वरीमध्ये 166 नवे रुग्ण आढळले आहेत. ज्यामुळे के पूर्व वॉर्ड मुंबईतील सर्वात मोठा हॉटस्पॉट ठरत आहे.
अंधेरी- जोगेश्वरी येथे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मुंबईतील धारावी, दादर आणि महिम परिसरात कोरोना सर्वाधिक रुग्ण आढळून आले होते. मात्र, शनिवारी एका दिवसात अंधेरी आणि जोगेश्वरीमध्ये 166 नवे रुग्ण आढळल्याने अंधेरी पूर्व आणि जोगेश्ववरीचा समावेश असणारा के पूर्व विभाग आता प्रथम क्रमांकावर आला आहे. हे देखील वाचा- Coronavirus: दिलासादायक बातमी; महाराष्ट्रातील लातूर, उस्मानाबाद, हिंगोली, वाशीम जिल्ह्यात गेल्या 14 दिवसांत एकाही रुग्णांची नोंद नाही
चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना विषाणूने संपूर्ण भारताला हादरून सोडले आहे. देशात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने होणारी वाढ पाहता प्रशासनापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. दरम्यान, कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक कठोर पावले उचलली जात आहेत. सध्या महाराष्ट्रात कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येतही वाढ होत असल्याचे समजत आहे. ज्यामुळे नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळत आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत एक लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहे. यापैकी 3 हजार 830 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 49 हजार 346 जणांनी कोरोनावर मात केली आहे.