Coronavirus: वांद्रे पूर्व मधील कलानगर परिसर सील करण्यासोबत Containment Zone म्हणून घोषित
याच पार्श्वभुमीवर उद्धव ठाकरे राहत असलेल्या वांद्रे पूर्व येथील कलानगरचा परिसर सील करण्यात आला आहे. त्याचसोबत हा परिसर कॉन्टैमिनेटेड झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी ठोस पावले उचलली जात आहेत. तरीही कोरोनाबाधितांचा आकडा वाढला असून तो आता 1666 वर पोहचला आहे. तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत लॉकडाउनच्या संदर्भात महत्वाचा निर्णय घेणार असल्याचे बोलले जात आहेत. त्याचसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) सुद्धा नागरिकांसोबत व्हिडिओच्या माध्यमातून कोरोना पासून बचाव करण्यासाठी वारंवार सुचना देत असतात. याच पार्श्वभुमीवर उद्धव ठाकरे राहत असलेल्या वांद्रे पूर्व येथील कलानगरचा परिसर सील करण्यात आला आहे. त्याचसोबत हा परिसर कॉन्टैमिनेटेड झोन (Containment Zone) म्हणून घोषित करण्यात आला आहे.
कोरोना व्हायरसचा राज्यात वेगानै फैलाव होत असल्याने मुंबईतील काही ठिकाणे कॉन्टैमिनेटेड झोन्स म्हणून घोषित करण्यात आले आहेत. त्याचसोबत दाटीवाटीच्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना शाळांमध्ये हलवण्यात येणार असून या ठिकाणच्या परिसवरावर आता ड्रोनची नजर राहणार आहे. पण आता कलानगर सारखा परिसर सील करण्यात आला असून येथे काही पोलीस कर्मचारी सुद्धा तैनात आहेत.(मुंबई मधील Containment Zones सह दाटीवाटीच्या ठिकाणी BMC उभारणार 10 कोरोना स्क्रिनिंग क्लिनिक्स)
दरम्यान, भारतात 130 कोटी लोकसंख्या असून कोरोनाच्या पार्श्वभुमीवर त्याचा फैलाव रोखणे सरकारपुढे आव्हान आहे. तर दुसऱ्या बाजूला डॉक्टर्स, वैद्यकिय कर्मचारी कोरोनाबाधित रुग्णांवर दिवसरात्र उपचार करत आहेत. तसेच पोलीस सुद्धा रस्त्यावर गस्त घालून विनाकारण फिरणाऱ्या लोकांच्या विरोधात कारवाई करत आहेत.