Coronavirus:मुंबईतील दाट लोकवस्तीच्या भागात लॉकडाउनच्या आदेशाचे कठोर पालन करण्यासाठी ड्रोन नजर ठेवणार-राजेश टोपे
मात्र आता मुंबईतील दाट वस्तीमध्ये लॉकडाउनच्या आदेशाचे कठोर पालन केले जाणार असून येथील नागरिकांवर आता ड्रोनची नजर असणार असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.
देशभरासह महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचे संक्रमण झालेल्या रुग्णांचा आकडा 1364 वर पोहचला आहे. तर गुरुवारी 25 जणांना बळी गेल्याने मृतांची संख्या 97 वर गेली आहे. त्यामुळे राज्यातील सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता गंभीर असून नागरिकांनी सरकारच्या नियमांचे पालन करणे अत्यंत महत्वाचे आहे. तसेच लॉकडाउनच्या काळात ही विनाकारण रस्त्यावरुन फिरल्यास आता कठोर कारवाई केली जाणार आहे. त्याचसोबत नागरिकांनी सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचे पालन करावे अशा सुचना सुद्धा देण्यात आल्या आहेत. मात्र आता मुंबईतील दाट वस्तीमध्ये लॉकडाउनच्या आदेशाचे कठोर पालन केले जाणार असून येथील नागरिकांवर आता ड्रोनची नजर असणार असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.
मुंबईतील दाट लोकवस्तीच्या भागात लॉकडाउन अधिक प्रभावी करण्यासाठी आणि निर्जंतुकीरणासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी महापालिकेला सूचना देण्यात आल्या आहेत.याभागात राज्य राखीव पोलिस दलाची मदत घेण्यासाठी गृहमंत्र्यांकडे मागणी ही करण्यात आल्याचे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. त्याचसोबत दाट वस्तीमधील नागरिकांच्या खोल्या 10x10 च्या असून त्यात 15 माणसे राहत असल्याने अशा परिस्थितीत सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाची अंमलबाजवणी करणे अशक्य आहे. त्यामुळे दाट वस्तीमधील नागरिकांना शाळांमध्ये हलवण्याच विचार करत असल्याचे ही राजेश टोपे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मुंबई शहरामध्ये वाढत्या कोरोनाग्रस्तांची संख्या पाहता आता मुंबई महानगर पालिकेने धारावीतील भाजी विक्रेते, फळ विक्रेते सह फेरीवाल्यांना धारावीतील कंटेनमेंट झोन, बफर झोन मध्ये आता व्यवसाय करण्यावर बंदी घातली आहे. दरम्यान धारावीतील कोरोना व्हायरसचा धोका आटोक्यात ठेवण्यासाठी प्रशासनाकडून ही खबरदारी घेतली जात आहे.De