Coronavirus: मुंबईतील 53 पत्रकारांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह- मुंबई महापालिका
त्यामुळे सरकारने लॉकडाउनचे आदेश पुढील काही दिवस कायम राहणार आहेत. तसेच नागरिकांना लॉकडाउनच्या काळात घरातच थांबण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
देशभरासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्यामुळे सरकारने लॉकडाउनचे आदेश पुढील काही दिवस कायम राहणार आहेत. तसेच नागरिकांना लॉकडाउनच्या काळात घरातच थांबण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दुसऱ्या बाजूला वैद्यकिय कर्मचारी, नर्स आणि डॉक्टर्स कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करत आहेत. परंतु नागरिकांपर्यंत कोरोना संदर्भातील अपडेट देण्यासाठी पत्रकार बांधव ऑनफिल्ड राहून त्याची अधिक माहिती देत असतात. याच पार्श्वभुमीवर आता मुंबईतील 53 पत्रकारांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. याबाबतची अधिक माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील सर्वाधित कोरोनाबाधित रुग्ण मुंबई आणि पुणे येथे आढळून आले आहेत. त्यामुळे मुंबई आणि पुणे शहरांना रेड झोन मध्ये दाखल केले आहेत. मात्र अत्यावश्यक सेवासुविधा पुरवणाऱ्या नागरिकांनाच कामासाठी बाहेर पडण्यास परवानगी आहे. याच परिस्थितीत आता मुंबईतील 53 पत्रकारांना कोरोनाची लागण झाली आहे.या सर्व पत्रकारांना विलिगणीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. तर 171 पत्रकारांनाचे नमूने घेण्यात आले आहेत हे सर्व पत्रकार फोटोग्राफर्स, व्हिडिओ, जर्नलिस्ट आणि रिपोर्ट्स आहेत. बहुतांश जणांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.(Coronavirus: मुंबई मध्ये प्रसारमाध्यमांच्या 30 'On Field' पत्रकारांना कोरोनाची लागण- IANS)
दरम्यान, महाराष्ट्रात 283 नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने आकडा 4483 वर पोहचला आहे. 283 पैकी 187 कोरोनाचे रुग्ण हे मुंबईतील असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्याची रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन नुसार विभागणी करण्यात आली आहे. आजपासून कोरोनाच्या नॉन-हॉटस्पॉट ठिकाणी काही लॉकडाउनचे नियम शिथिल करण्यात आले आहेत.