Coronavirus: तबलीगी जमातीच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावलेले महाराष्ट्रातील 1300 जण क्वारंटाइन- राजेश टोपे
या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील शेकडो लोकांनी उपस्थिती लावली होती. त्यानंतर या कार्यक्रमाला उपस्थिती लावलेल्या लोकांना कोरोनाची लागण झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
देशात कोरोना व्हायरने थैमान घातले असून दिवसेंदिवस रुग्णंची संख्या वाढत चालली आहे. यामुळे सरकार कडून कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी ठोस पावले उचलली जात आहेत. ऐवढे नाही तर नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच देशातील विविध राज्यातील कार्यक्रमांना बंदी ही घालण्यात आली आहे. मात्र तरीही दिल्लीत तबलीगी जमातीकडून एका धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील शेकडो लोकांनी उपस्थिती लावली होती. त्यानंतर या कार्यक्रमाला उपस्थिती लावलेल्या लोकांना कोरोनाची लागण झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे या नागरिकांनी स्वत:हून पुढे यावे असे आवाहन करण्यात आले आहे. तर महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी असे म्हटले आहे की, महाराष्ट्रातील एकूण 1300 जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.
निजामुद्दीन मरकज कार्यक्रमाला विविध देशातून मोठ्या प्रमाणात नागरिकांनी उपस्थिती लावली. त्यानंतर कार्यक्रमातील काही जणांना सर्दी, खोकला सारखे वाटू लागल्याने त्यांनी मदतीसाठी मागणी केली असता मरकजच्या इमारतीत बहुसंख्येने तबलीगी समाजाचे नागरिक दिसून आले. यामध्ये महाराष्ट्रातील एकूण 1400 जणांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. त्यापैकी 1300 जणांना ट्रेस करण्यात आले असून त्यांना क्वारंटाइन केले आहे. या सर्व जणांचे नमूने जमा करुन कोरोनाच्या चाचणीसाठी आता पाठवण्यात येणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. (Coronavirus: दिल्लीतील निजामुद्दीन मरकज कार्यक्रमाला उपस्थिती लावलेल्या पुण्यातील 60 नागरिकांना क्वारंटाइनचा सल्ला)
दरम्यान, दिल्लीतील कार्यक्रमावर मोदी सरकारमधील केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. हा प्रकार माफीच्या लायक नसून “तालिबानी जुर्म”असल्याचे म्हटले आहे. त्यांनी ट्वीटच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला आहे. जेव्हा संपूर्ण भारत देश एकजुटीने कोरोना व्हायरस संकटाचा सामना करत आहे तेव्हा अशा' गंभीर गुन्ह्याला' माफ केले जाऊ शकत नाही. हा हलगर्जीपणा नसून 'गंभीर अपराधाचा' प्रकार असल्याचं त्यांनी म्हटले आहे.