Lockdown च्या दुसऱ्या टप्प्यात 20 एप्रिल पासून नेमक्या कोणत्या सेवा-सुविधा सुरु होणार? पहा संपूर्ण यादी
परंतु, त्यासाठी कठोर नियम, अटी लागू करण्यात आल्या आहेत. दरम्यान अनेक लोकांमध्ये नेमकं काय सुरु होणार याबाबत संभ्रम आहे. जाणून घेऊया लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात नेमके काय सुरु होणार?
संपूर्ण भारताला ग्रासलेल्या कोरोना व्हायरसचा विस्तार महाराष्ट्र राज्यात सातत्याने वाढताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला आहे. मात्र कोरोनाचे हॉटस्पॉट नसलेल्या ठिकाणी आजपासून (20 एप्रिल) काही उद्योगधंदे, व्यवसाय सुरु करण्यास मुभा देण्यात आली आहे. परंतु, त्यासाठी कठोर नियम, अटी लागू करण्यात आल्या आहेत. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधताना याची माहिती दिली. दरम्यान अनेक लोकांमध्ये नेमकं काय सुरु होणार याबाबत संभ्रम आहे. जाणून घेऊया लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात नेमके काय सुरु होणार? (ग्रीन, ऑरेंज झोन मधील उद्योगांना परवानगी, जिल्हाबंदीचे नियम ते हेल्पलाईन नंबर! उद्धव ठाकरे यांच्या महत्वाच्या घोषणा)
आरोग्यविषयक सुविधा, कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, वित्तविषयक सेवा, सामाजिक सेवा, वस्तू-मालांची राज्यांतर्गत आणि आंतरराज्यीक वाहतूक आजपासून सुरु होणार आहे. त्याचबरोबर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात सुरळीत सुरु राहणार आहे.
आजपासून सुरु होणाऱ्या सेवा-सुविधांची संपूर्ण यादी:
नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेत कंटेनमेंट झोन वगळत इतर ठिकाणी काही कामांना लॉकडाऊनच्या नियमातून सूट देण्यात आली आहे. तरी देखील नागरिकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. सध्या महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचे 4200 रुग्ण आहेत. त्यापैकी 507 रुग्ण कोरोना संसर्गातून पूर्णपणे रिकव्हर झाले असून 3470 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर कोरोनाने एकूण 223 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.