Coronavirus: महाराष्ट्रात लॉकडाउनचे आदेश येत्या 3 मे पर्यंत कायम- आरोग्यमंत्री राजेश टोपे
त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी पहिल्या टप्प्यातील लॉकडाउन संपल्यानंतर आणखी काही दिवस लागू राहणार असल्याचा निर्णय जाहीर केला होता.
महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी पहिल्या टप्प्यातील लॉकडाउन संपल्यानंतर आणखी काही दिवस लागू राहणार असल्याचा निर्णय जाहीर केला होता. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी भारतात लॉकडाउनचे आदेश 3 मे पर्यंत असणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर आता महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी राज्यात लॉकडाउनचे आदेश येत्या 3 मे पर्यंत कायम राहणार असल्याचा निर्णय आता जाहीर केला आहे. नागरिकांना अत्यावश्यक सेवासुविधा नेहमी प्रमाणेच पुरवल्या जाणार आहेत. मात्र नागरिकांनी आवश्यक तेवढाच साठा करुन ठेवावा असे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे.
राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 6 हजारांच्या पार गेला आहे. तर कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सरकारकडून सर्वोतोपरी प्रयत्न केला जात आहे. त्याचसोबत कोरोनाबाधितांच्या रुग्णांवर डॉक्टर्स, नर्स आणि वैद्यकिय कर्मचाऱ्यांकडून दिवसरात्र उपचार केले जात आहेत. त्यामुळे नागरिकांनी राज्यातील कोरोनाची परिस्थिती गांभीर्याने घेण्याते अत्यावश्यक आहे. तसेच पोलीस आणि वैद्यकिय कर्मचाऱ्यांवर हल्ले करण्याचे थांबवावे अथवा कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी सुचना देण्यात आली आहे.(मुंबई: धारावीत आणखी 21 नवे कोरोनाबाधीत आढळले; आतापर्यंत 241 लोकांना संसर्ग तर, 14 जणांचा मृत्यू)
दरम्यान, महाराष्ट्राची रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे. तसेच मुंबई आणि पुण्यात सर्वाधिक कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळून आले आहेत. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्क लावणे अनिवार्य असल्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. त्याचसोबत 20 एप्रिल पासून कोरोनाच्या नॉन- हॉटस्पॉट ठिकाणी लॉकडाउन संबंधित काही नियम शिथिल करण्यात आले आहेत.