Coronavirus: जनशक्तीच्या जोरावर करोना व्हायरस संकटावर मात करु - उपमुख्यमंत्री अजित पवार

पण, म्हणून घाबरुन जाण्याचे कारण नाही. प्रत्येकाने स्वत:ची आपल्या कुटुंबाची काळजी घेतली. शासनाने आखून दिलेल्या नियमांचे पालन केल्यास आपण लवकरच कोरोना संकटावर मात करु.

Ajit Pawar | (File Image)

अवघा महाराष्ट्र कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाविरुद्ध लढत आहे. राज्यातील जोनतेचा कोरनाविरोधातील लढ्यात सरकारला पाठिंबा आहे. त्यामुळे जनशक्तीच्या जोरावर कोरोना व्हायरस संकटांवर महाराष्ट्र नक्की मात करेन, अशी भावना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) व्यक्त केली आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांनी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने उभारण्यात आलेल्या वॉर रुमला भेट दिली. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

या वेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, कोरोना व्हायरस हे आव्हान नक्कीच आहे. पण, म्हणून घाबरुन जाण्याचे कारण नाही. प्रत्येकाने स्वत:ची आपल्या कुटुंबाची काळजी घेतली. शासनाने आखून दिलेल्या नियमांचे पालन केल्यास आपण लवकरच कोरोना संकटावर मात करु.

सध्याची स्थिती ही राजकारण करण्याची नाही. राज्य आणि नागरिकांच्या हिताला प्राधान्य देण्याची आहे.राज्यातील स्थिती हळूहळू नियंत्रणाखाली येत आहे. राज्यातील उद्योग सुरु होत आहे. उद्योग सुरु करण्यासाठी आवश्यक ती परवानगी दिली आहे. मात्र, परप्रांतीय कामगार मोठ्या प्रमाणात परत निघून गेले आहेत. त्यामुळे मजूरांचा तुटवडा भासत आहे. मात्र, ही स्थितीही लवकरच सुधारेन. परिस्थिती नक्कीच पूर्व पदावर येत आहे. पोलीस, डॉक्टर, नर्स, आरोग्य विभागातील कर्मचारी करोनामुक्तीसाठी जीवाची पर्वा न करता प्रयत्न करत आहेत. त्यांना साथ देण्याची गरज असल्याची भावनाही अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. (हेही वाचा, महाराष्ट्रात विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कार्यक्रम आयोजनाकरिता दूरदर्शनवर 12 तास, रेडिओसाठी 2 तासांचा स्लॉट उपलब्ध करून द्या-शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची केंद्र सरकारकडे मागणी3)

ट्विट

अजित पवार यांनी वॉर रुमला भेट दिली त्या वेळी त्यांच्यासोबत पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे, विरोधी पक्षनेते नाना काटे, आमदार अण्णा बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, महिला शहराध्यक्ष वैशालीताई काळभोर, नगरसेवक राजू मिसाळ, पालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे, पालिका व वायसीएम अधिकारी यावेळी उपस्थित होते.