Coronavirus in Pune: पुण्यातील कोविड-19 लाट जानेवारीच्या अखेरीस किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात शिगेला पोहचू शकते; जाणून घ्या सध्याची परिस्थिती

यामध्ये सध्याच्या परिस्थितीत, अर्थव्यवस्था आणि सामान्य जीवनाशी संबंधित कोणत्याही निर्बंधांचा प्रस्ताव दिला जाणार नाही. परंतु लोकांना कळकळीने विनंती करतो की त्यांनी सर्व कोविड-योग्य वर्तनाचे पालन करावे

Representational Image | (Photo Credits: IANS)

महाराष्ट्रातील पुणे (Pune) जिल्ह्यात कोविड-19 (Coronavirus) प्रकरणांची सध्या सुरू असलेली लाट जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात शिगेला पोहोचू शकते. त्यामुळे परिस्थिती हाताळण्यासाठी आरोग्य पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी प्रशासन योग्य ती सर्व पावले उचलत आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने बुधवारी याबाबत माहिती दिली. पुण्यात मंगळवारी 21 टक्के पॉझिटिव्ह दरासह 6,110 कोरोना व्हायरस प्रकरणे नोंदवली गेली. अशाप्रकारे जिल्ह्य़ातील रुग्णांची संख्या 12,01,439 झाली, तर मृतांची संख्या 19,271 वर पोहोचली.

पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव म्हणाले की, जिल्ह्य़ात सध्या संसर्गाच्या संख्येत वाढ होत आहे आणि अधिकारी सर्व प्रतिबंधात्मक आणि सावधगिरीची पावले उचलत असल्याची खात्री करत आहेत. राव पुढे म्हणाले, संसर्गाच्या वेगाच्या बाबतीत पुणे मुंबईपेक्षा तीन आठवडे मागे आहे. सध्या इथली प्रकरणे शिगेला पोहोचली आहेत, हे सांगणे खूप घाईचे ठरेल. मला अपेक्षा आहे की कदाचित जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात, सध्या मुंबई जिथे आहे तिथे पुणे पोहोचले.

जर जानेवारीच्या अखेरीस किंवा फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत मुंबई पूर्णपणे सुरक्षित झाली आणि तेथील परिस्थिती सामान्य झाल्यास, फेब्रुवारी किंवा मार्चच्या अखेरीस पुणे जिल्ह्यातही अशीच स्थिती दिसून येईल, असेही राव म्हणाले. पुण्यातील हवामान, लोकसंख्या आणि राहण्याची शैली मुंबईपेक्षा वेगळी असल्याने परिस्थिती बदलू शकते. परंतु मागील कोरोना लाटेच्या अनुभवांनुसार मार्चच्या मध्यापर्यंत आपण अधिक चांगल्या स्थितीत येऊ असे आपण म्हणू शकतो, असे ते म्हणाले.

सध्याच्या परिस्थितीबद्दल बोलताना राव म्हणाले, गेल्या दोन ते तीन आठवड्यांत साप्ताहिक सकारात्मकता दर वाढला आहे. हा दर 3 टक्क्यांवरून 21 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. गेल्या तीन ते चार दिवसांची तुलना केल्यास, सकारात्मकता दर 14-15 टक्क्यांवरून 21 टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबई, कोलकाता किंवा दिल्लीतील कल पाहता, पुणे जिल्हा जवळपास 35 टक्के सकारात्मकता दरापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. याला थोडा विलंब होऊ शकतो, (हेही वाचा: Covaxin चा बुस्टर डोस Omicron आणि Delta प्रकारावर करतो मात- Bharat Biotech चा दावा)

राव यांनी पुढे सांगितले, पुढील कोरोना व्हायरस आढावा बैठक शुक्रवारी होणार आहे. यामध्ये सध्याच्या परिस्थितीत, अर्थव्यवस्था आणि सामान्य जीवनाशी संबंधित कोणत्याही निर्बंधांचा प्रस्ताव दिला जाणार नाही. परंतु लोकांना कळकळीने विनंती करतो की त्यांनी सर्व कोविड-योग्य वर्तनाचे पालन करावे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif