नागपूर जिल्ह्यातील वाढत्या कोरोना रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर नियमावली कडक; शाळा, कॉलेज ते लग्नाचे हॉल बंद करण्याबाबत नितीन राऊत यांनी दिले हे आदेश
त्यामुळे आज नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितिन राऊत (Nitin Raut) यांनी नागपूर जिल्ह्यासाठी नियमावली कडक केली आहे
नागपूर जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे आज नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितिन राऊत (Nitin Raut) यांनी नागपूर जिल्ह्यासाठी नियमावली कडक केली आहे. आज त्यांनी याबाबत माहिती देताना अत्यावश्यक सेवा वगळता इतर काही गोष्टींबाबत नियम कडक केले आहेत. यामध्ये शाळा, कॉलेज, बाजार, हॉटेल ते लग्नाचे हॉल यांचा त्यामध्ये समावेश आहे. I Am Responsible: 'मी जबाबदार' मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून नवीन मोहिमेची घोषणा.
-
- महाराष्ट्रातील वाढती रूग्णसंख्यसंख्या पाहता आता नागपूर मध्ये कोरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्यातील शाळा, कॉलेज, कोचिंग क्लास 7 मार्च पर्यंत बंद राहणार आहे.
- नागपूर जिल्ह्यामधील सर्व बाजारपेठा शानिवार- रविवार बंद राहणार आहे.
- दरम्यान यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत म्हणजे वृत्तपत्र, दूध भाजीपाला, फळे, औषध पेट्रोल पंप सुरू राहणार आहेत.
- नागपूर मध्ये हॉटेल, रेस्टॉरंट 50% क्षमतेने सुरू राहणार आहेत.
- लग्नाचे हॉल हे 25 फेब्रुवारी नंतर 7 मार्च पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.
दरम्यान सामाजिक भान राखत कॅबिनेट मंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री यांनी नितीन राऊत यांनी त्यांच्या मुलाच्या लग्नाचा रिसेप्शन सोहळा रद्द केला आहे. त्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल कौतुक देखील केले आहे.
अमरावती,अचलपूर कर्फ्यू
दरम्यान आज अमरावती म्युनिसिपल कॉरपरेशन आणि अचलपूर म्युनिसिपल काऊंसिल यांनी देखील कर्फ्यू जाहीर केला आहे. हा कर्फ्यू आज 22 फेब्रुवारी दिवशी रात्री 8 वाजल्यापासून 1 मार्च ला सकाळी 6 वाजेपर्यंत असेल. या कर्फ्यू मध्ये देखील केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. मात्र त्या देखील सकाळी 8 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंतच खुली ठेवली जाणार आहेत.