Coronavirus in Mumbai: मुंबईकरांनो नियमांचे पालन करा! आज शहरात कोरोनाच्या आणखी 1539 रुग्णांची भर पडल्याची BMC ची माहिती
त्यामुळे स्थानिक प्रशासनाकडून कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. अशातच आता मुंबईत कोरोनाच्या रुग्णांचा आकडा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने 1 हजारांच्या पार जात आहे.
Coronavirus in Mumbai: राज्यासह मुंबईत कोरोनाचे रुग्ण पुन्हा एकदा झपाट्याने वाढत चालले आहेत. त्यामुळे स्थानिक प्रशासनाकडून कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. अशातच आता मुंबईत कोरोनाच्या रुग्णांचा आकडा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने 1 हजारांच्या पार जात आहे. याच पार्श्वभुवीर महापालिकेने आज शहरात कोरोनाचे आणखी 1539 रुग्ण आढळल्याची माहिती दिली असून 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच शहरात कोरोनाच्या रुग्णांचा रिकव्हरी रेट 93 टक्क्यांवर पोहचला असून 9 मार्च पर्यंत 34,75,744 कोरोनाच्या चाचण्या पार पडल्या आहेत.
शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने नागरिकांनी नियमांचे पालन करावे असे वारंवार आवाहन करण्यात येत आहे. अशातच आता कोरोनाच्या लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुद्धा सुरुवात झाली असून शासकीय केंद्रासह खासगी रुग्णालयात ही त्याची सुविधा नागरिकांना उपलब्ध करुन दिली गेली आहे.(Mumbai COVID-19 Vaccination: मुंबईतील खासगी केंद्रांवर 24x7 कोरोना लसीकरण होणार- BMC)
Tweet:
त्याचसोबत मुंबईत गेल्या दोन महिन्यात 90 टक्के ही रुग्ण संख्या रहिवाशी इमारतीमधील असल्यााची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई केली जाणार आहे, त्याचसोबत महापालिकेने पुढे असे ही म्हटले आहे की, 9 मार्च पर्यंत 2762 इमारतीचे मजले सील केले असून कोरोनाचे 4183 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.(Mumbai: विमान प्रवासासाठी कोविडचे बनावट रिपोर्ट्स दाखवणाऱ्या परिवाराच्या विरोधात FIR दाखल)
Tweet:
दरम्यान, राज्यात कोरोनाचे पुन्हा एकदा रुग्ण वाढत चालले असून नागरिकांनी नियमांचे पालन करावे असे वारंवार आवाहन केले जात आहे. त्याचसोबत ज्या नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन केले जात आहे त्यांच्या विरोधात कठोर कारवाई केली जात आहे. तर काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून नागरिकांना जर पुन्हा एकदा लॉकडाऊन नको असेल तर मास्क घालण्यासह नियमांचे पालन करावे असे स्पष्ट केले होते. त्याचसोबत मुंबईत सुद्धा कोरोनाच्या रुग्णांचा आकडा हा सध्या सामान्य नागरिकांसाठी सुरु करण्यात आलेल्या लोकलमुळे काही प्रमाणात वाढत असल्याचे बोलले जात आहे.