Coronavirus In Mumbai: कोरोनाची लक्षणे नसलेल्यांनी घरीच आयसोलेशमध्ये राहण्याची BMC ची सूचना

Coronavirus Outbreak (Photo Credits: PTI)

देशभरासह महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुळे मृत्यू झाल्याच्या प्रकरणात घट झाली आहे. याच पार्श्वभुमीवर महापालिकेने बुधवारी होम आयसोलेशन संदर्भात सुधारित मार्गदर्शक सुचना जाहीर केली आहे. त्यानुसार कोरोनाची लक्षणे नसलेल्या रुग्णांनी, कोणत्याही वयाच्या व्यक्तीने आता रुग्णालयात येऊन बेड्स बुक करण्यापेक्षा घरीच थांबावे अशा सुचना दिल्या आहेत.(पुणे जिल्ह्यात रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवणा-या टँकरना रुग्णवाहिकांचा दर्जा देण्याचे आदेश; टँकरमध्येही असणार 'ही' विशेष सुविधा)

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाची लक्षणे नसलेले रुग्ण रुग्णालयात उपचारासाठी आल्यास बेड्स त्यांच्यामुळे भरले गेल्याने त्याची पुरेशी उपलब्धता होत नाही. कोरोनाचे बहुतांश रुग्ण हे इमारतीमधील आहेत. त्यामुळे त्यांनी सार्वजनिक रुग्णालयात येऊन उपचार घेण्याऐवजी खासगी रुग्णालयात जात आहेत. त्यामुळेच खासगी क्षेत्रातील रुग्णालयातील बेड्सची उपलब्धता कमी होत असल्याचे महापालिकेच्या डॉक्टरांनी म्हटले आहे.

महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा असे म्हटले आहे की, इमारती मधून येणाऱ्या रुग्णांनी घरीच आयोलेशनध्ये रहावे. खासकरुन जेष्ठ नागरिक ज्यांना कोरोनाची लक्षणे नाहीत त्यांना रुग्णालयापेक्षा घरीच आराम अधिक मिळू शकतो. ऐवढेच नाही आजूबाजूच्या सुद्धा त्रास होत नसल्याचे ही महापालिकेने म्हटले आहे.(My Family, My Responsibility Campaign: कोरोना विषाणू सोबत जगण्यासाठी जीवनशैलीमध्ये बदल करणे आवश्यक; BMC ने जारी केल्या वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक स्तरावर काळजी घेण्यासाठी मार्गदर्शक सूचना)

गेल्या महिन्यात महापालिकेने मृत्यूदर कमी केला आहे. त्यामुळे कोरोनाची लक्षणे नसलेल्यांनी घरीच उपचार घ्यावेत. तसेच डायबिटीस, उच्चरक्तदाब असे असे आजार असून वयाच्या 60 वर्षाखालील व्यक्ती सुद्धा घरीच राहून कोरोनासंदर्भात उपचार घेऊ शकतात. परंतु 60 वर्षावरील व्यक्तींनी घरीच उपचाराठी थांबू नये ही सांगण्यात आले आहे.