Coronavirus: सांगली चिंतामूक्त! कोरोना व्हायरस हॉटस्पॉट इस्लामपूर शहराची COVID-19 मुक्तीकडे वाटचाल

त्यामुळे आम्ही हे आव्हान पेलू शकलो, असे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयंत पाटील यांनी सांगितले.

Coronavirus | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस (Coronavirus) हॉटस्पॉट ठरलेल्या सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर (Islampur City) हे शहर पूर्णपणे COVID-19 मुक्ततेकडे वाटचाल करत असल्याचे चित्र आहे. इस्लामपूर जिल्ह्यातील कोरोना व्हायरस बाधित एकूण 26 पैकी 22 रुग्णांची COVID-19 चाचणी पूर्णपणे निगेटीव्ह आली आहे. त्यामुळे सांगली (Sangli) जिल्ह्यातील प्रशासन आणि लोकप्रतिनिधींसह जनतेने सुटकेचा निश्वास सोडला आहे. महाष्ट्रातील जनता आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) सरकारसाठी हा कोरोना लढ्यातील सर्वात मोठा दिलासा आहे.

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर हे एक अत्यंत महत्त्वाचे शहर. जवळपास 70 हजार पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या या शहरात अचानक कोरोना व्हायरस बाधित रुग्ण सापडले. त्यांची संख्या वाढतच गेली. त्यामुळे सांगली जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचे धाबे दणाणले. मात्र, राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाने केलेल्या उपाययोजना कामी आल्या. इथल्या कोरोना रुग्णांची संख्या घटण्यास सुरुवात झाली. आता तर संपूर्ण इस्लामपूर कोरोना मुक्त होत असल्याचे जाहीर करावी अशी स्थिती आहे. (हेही वाचा, Coronavirus in Maharashtra: महाराष्ट्र राज्यात कोरोना व्हायरसचे संकट अधिक तीव्र; 92 नव्या रुग्णांसह कोरोना बाधितांचा आकडा 1666 वर)

जयंत पाटील ट्विट

दरम्यान, कोरोनाचा मुकाबला करुन तो नियंत्रणात आणण्यासाठी आम्ही 'विलगीकरण, समूह संसर्गाच्या ठिकाणाची ओळख व तत्काळ कार्यवाही हे त्रिसूत्री धोरण जिल्ह्यात अमलात आणले'. त्यामुळे आम्ही हे आव्हान पेलू शकलो, असे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयंत पाटील यांनी सांगितले. कोरोना नियंत्रणासाठी 'विलगीकरण, समूह संसर्गाच्या ठिकाणाची ओळख व तत्काळ कार्यवाही हे त्रिसूत्री धोरण' ही त्रिसूत्री असल्याचेही जयंत पाटील यांनी म्हटले. 'प्रशासन व नागरिकांच्या सहकार्याने आम्ही कोरोनाच्या प्रादुर्भावाला आटोक्‍यात आणले आहे, असे सांगत जयंत पाटील यांनी प्रशासन आणि जनतेचे आभारही मानले.