Coronavirus: कस्तुरबा रुग्णालयात रुग्णाचा मृत्यू कोरोना व्हायरस संसर्गाने झाल्याची पुष्टी नाही - राजेश टोपे
या नमुन्यांच्या चाचणीचा अहवाल अद्याप आला नाही. त्यामुळे या व्यक्तीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे आताच सांगता येणार नाही. या व्यक्तीला हायपरटेन्शन आणि इतरही काही आजार होते.
कोरोना व्हायरस (Coronavirus) पीडित व्यक्तीचा मुंबई येथील कस्तुरबा रुग्णालयात उपचारादरम्यन मृत्यू झाल्याचे वृत्त प्रसारमध्यमांनी दिले आहे. मात्र, राज्याचे आरोग्यमंत्री, रुग्णालय प्रशासन आणि राज्य सरकारकडून याची अद्याप पुष्टी झाली नाही. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी आज (17 मार्च 2020) दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत कोरोना व्हायरस स्थितीबाबत माहिती दिली. या वेळी कस्तुरबा रुग्णायल (Kasturba Hospital) येथे एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मात्र त्याचा मृत्यू कोरोना व्हायरस संसर्ग झाल्यामुळेच झाल्याची कोणतीही माहिती नाही.
कस्तूरबा रुग्णालयात मृत्यू झालेल्या 'त्या' व्यक्तीचे नमुने घेतले असून ते प्रयोगशाळेत पाठवले आहेत. या नमुन्यांच्या चाचणीचा अहवाल अद्याप आला नाही. त्यामुळे या व्यक्तीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे आताच सांगता येणार नाही. या व्यक्तीला हायपरटेन्शन आणि इतरही काही आजार होते. त्यामुळे त्याची पार्श्वभूमी विचारात घेता त्या व्यक्तीचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचे इतक्यातच म्हणता येणार नाही, असेही राजेश टोपे यांनी सांगितले. (हेही वाचा, Coronavirus: पुण्यात कोरोना व्हायरसचा कहर; शाळा, महाविद्यालय सिनेमागृहानंतर आजपासून 3 दिवस ज्वेलर्सची दुकानेही राहणार बंद!)
डीजीआयपीआर ट्विट
राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय द्वाराही एक ट्विट करण्यात आले आहे. या ट्विटमध्ये ''दुबईहून प्रवास केलेल्या 63 वर्षीय रुग्णाचा आज सकाळी 7 वाजता कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू. सदर व्यक्तीची कोरोनाची चाचणी झाली होती, मात्र या व्यक्तीचा मृत्यू कोरोनामुळे झाला की अन्य पूर्वआजारामुळे याची खात्री केली जात आहे '', असे म्हटले आहे.