Coronavirus: राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना कोरोना व्हायरस संसर्ग; प्रकृती उत्तम
सर्दी, खोकला आणि सौम्य प्रमाणात तापही जाणवत होता. त्यामुळे त्यांना नजिकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालात त्यांची कोरोना व्हायरस चाचणी करण्यात आली. ती पॉझिटिव्ह आली.
राज्याचे माजी मुख्यमंत्री (Former Chief Minister) आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते शिवाजीराव पाटील-निलंगेकर (Shivajirao Patil Nilangekar) यांना कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमन झाले आहे. त्यांच्यावर लातूर (Latur) येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृतीही उत्तम आहे. मात्र, शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांचे वय (91 वर्षे) पाहता गरज पडल्यास त्यांच्यावर अत्यावश्यक उपचारांची आवश्यकता भासू शकते. त्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी पुण्याला (Pune) हालवण्याचा विचार त्यांच्या निकटवर्तींयकडून सुरु असल्याचे समजते.
शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना गेल्या काही दिवसांपासून प्रकृतीअस्वास्थ्य जाणवत होते. सर्दी, खोकला आणि सौम्य प्रमाणात तापही जाणवत होता. त्यामुळे त्यांना नजिकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालात त्यांची कोरोना व्हायरस चाचणी करण्यात आली. ती पॉझिटिव्ह आली. निलंगेकर यांची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर आता त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांचीही तपासणी आणि चाचणी करण्यात येणार आहे.
शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे वय सध्या 91 वर्षे आहे. त्यांना मधूमेह आणि इतरही काही किरकोळ व्याधी आहेत. त्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी पुण्याला नेले जाऊ शकते, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे. (हेही वाचा,Coronavirus in Pune: पुण्यातील BJP आमदार मुक्ता टिळक व आईला कोरोना विषाणूची लागण; घरीच आयसोलेशनमध्ये राहण्याचा डॉक्टरांचा सल्ला )
दरम्यान, राज्याच्याच्या माजी मुख्यमंत्र्याला कोरोना व्हायरस संक्रमन होण्याची ही दुसरी घटना आहे. या आधी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान सर्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना कोरोना व्हायरस संक्रमन झाले होते. अशोक चव्हाण यांनी वैद्यकीय उपचारानंतर कोरोना व्हायरसवर मात केली. त्यांची कोरोना व्हायरस चाचणी निगेटीव्ह आली असून सध्या त्यांची प्रकृती ठणठणीत आहे. शिवाय त्यांनी आपल्या दैनंदिन कामासोबतच आपल्या मंत्रालयीन कामालाही सुरुवात केली आहे.