Coronavirus Outbreak In Mumbai: कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पश्चिम आणि ट्रान्स हार्बर रेल्वे वरील एसी लोकल उद्या पासुन 31 मार्च पर्यंत रद्द
कोरोनाच्या दहशतीमुळे मुंबईच्या पश्चिम रेल्वे (Western Railway) मार्गावर चालवण्यात येणारी एसी लोकल (AC Local) सेवा 31 मार्च पर्यंत स्थगित करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे,
कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर आता मुंबईची लाईफलाईन (Mumbai Lifeline) म्ह्णून ओळखली जाणारी लोकल सुद्धा प्रभावित होणार आहे. कोरोनाच्या दहशतीमुळे मुंबईच्या पश्चिम रेल्वे (Western Railway) मार्गावर चालवण्यात येणारी एसी लोकल (AC Local) सेवा 31 मार्च पर्यंत स्थगित करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे, याबाबत पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क अधिकारी कार्यालयाने माहिती दिली आहे. उद्या, 20 मार्च पासून पुढील 11 दिवस ही एसी लोकलची सेवा बंद असणार आहे. तसेच, मध्य रेल्वेने (Central Railway) सुद्धा ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे ते वाशी/पनवेल/बेलापुर या दरम्यान चालवण्यात येणार्या 16 एसी लोकल बंद ठेवण्यात येणार आहेत. महाराष्ट्राच्या सहित मुंबई मधील कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असताना हा निर्णय खबरदारीचा पर्याय म्ह्णून घेण्यात आला आहे.
ANI ट्विट
COVID-19: कोरोनाच्या पार्श्वभुमीवर 168 भारतीय रेल्वे गाड्या 31 मार्च पर्यंत रद्द
मध्य रेल्वे ट्विट
वास्तविक मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकल सेवा सुद्धा बंद ठेवण्यात याव्यात अशा मागण्या होत होत्या, मात्र अर्थातच मुंबईची लाईफलाईन म्ह्णून ओळखली जाणारी लोकलसेवा बंद केल्यास लाखो नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागू शकतो, तसेच आपात्कालीन परिस्थितीत असा निर्णय घेणे चुकीचे ठरेल असे सांगत ही मागणी राज्य सरकारकडून फेटाळून लावण्यात आली होती, मात्र याच अनुषंगाने लोकलच्या प्लॅटफॉर्मवरील तिकिटाच्या दरात पाचपट वाढ करण्यात आली होती, जेणेकरून प्रवाशांच्या शिवाय स्थानकात विनाकारण गर्दी होणार नाही याची खबरदारी घेण्यात आली होती. याशिवाय स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा वारंवार नागरिकांना विनाकारण गर्दी करू नका असे आवाहन केले आहे.
दुधापेक्षा गोमूत्र, शेणाचे दर 500 रुपयांवर - Watch Video
दरम्यान, मुंबईच्या रस्त्यांवर सुद्धा गर्दी ओसरावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. BMC तर्फे मुंबईतील दादर, माटुंगा, माहीम, धारावी परिसरातील दुकानांना एक दिवस आड दुकाने सुरु ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आजच्या दिवसातच संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचे पाचहून जास्त रुग्ण समोर आल्याने आता रुग्णांचा आकडा 50 चा टप्पा गाठण्याच्या दिशेत आहे.