Coronavirus: महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची जिल्हानिहाय आकडेवारी; जाणून घ्या एका क्लिकवर

त्यानुसार प्राप्त झालेली अधिकृच आकडेवारी खालील तक्त्यात दिली आहे.

Coronavirus in Maharashtra | (Photo credit: archived, edited, symbolic images)

महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस (Coronavirus) बाधित रुग्णांची संख्या आता मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे. सुरुवातीला हाताच्या बोटावर मोजता येणारी हीच संख्या आता तब्बल काही हजारांच्या घरात पोहोचली आहे. काल रात्री हाती आलेल्या शेवटच्या माहितीनुसार, 352 नव्या रुग्णांसह महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस (COVID-19) बाधित रुग्णांची संख्या 2334 वर पोहोचली आहे. अर्थात, महाराष्ट्र सरकारने कोरोना व्हायरस टेस्ट करण्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर वाढविण्यात आले आहे. त्यामुळे ही संख्या वाढलेली दिसत असल्याचे राज्य सरकार सांगत आहे. दरम्यान, राज्यभरातील कोणत्या जिल्ह्यात कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या किती याबाबतच संबंध आकडेवारी आम्ही येथे देत आहोत.

महाराष्ट्रातील जिल्हानिहाय कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची इथे दिलेली आकडेवारी ही 13 मार्च 2020 या दिवशी सायंकाळी 6 वाजता अद्ययावत करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे आरोग्य मंत्रालय प्रत्येक दिवसाची कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची जिल्हानिहाय आकडेवारी आणि तपशील हा त्या त्या दिवशी सायंकाळी 6 किंवा त्याच दिवशी रात्री उशीरा अद्यावत करत असते. त्यानुसार प्राप्त झालेली अधिकृच आकडेवारी खालील तक्त्यात दिली आहे. (हेही वाचा - Coronavirus Outbreak In India: भारतात गेल्या 24 तासात 905 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण तर 51 जणांचा मृत्यू; देशातील कोरोना बाधितांची संख्या 9352 वर पोहोचली)

कोविड-19 महाराष्ट्र राज्याची जिल्हा/मनपा निहाय सध्या स्थिती

(*आकडेवारी दि. 11 एप्रिल 2020, सायं 6.00)बाधित रुग्ण

अ.क्र. जिल्हा/मनपा बाधित रुग्ण मृत्यू
1 मुंबई मनपा 1540 101
2 ठाणे 6 0
3 ठाणे मनपा 53 3
4 नवी मुंबई मनपा 46 3
5 कल्याण डोंबिवली मनपा 50 2
6 उल्हासनगर मनपा 1 0
7 भिवंडी निजामपूर मनपा 1 0
8 मीरा भाईंदर 49 2
9 पालघर 4 1
10 वसई विरार मनपा 26 3
11 रायगड 5 0
12 पनवेल मनपा 9 1
  ठाणे मंडळ एकूण 1790 116
1 नाशिक 2 0
2 नाशिक मनपा 2 0
3 मालेगाव मनपा 29 2
4 अहमदनगर 10 0
5 अहमदनगर मनपा 17 0
6 धुळे 2 1
7 धुळे मनपा 0 0
8 जळगाव 1 0
9 जळगाव मनपा 1 1
10 नंदुरबार 0 0
  नाशिक मंडळ एकूण 64 4
1 पुणे 7 0
2 पुणे मनपा 272 30
3 पिंपरी-चिंचवड मनपा 29 1
4 सोलापूर 0 0
5 सोलापूर मनपा 1 1
6 सातारा 6 2
  पुणे मंडळ एकुण 315 34
1 कोल्हापूर 1 0
2 कोल्हापूर मनपा 5 0
3 सांगली 26 0
4 सांगली मिरज कुपवाड मनपा 0 0
5 सिंधुदुर्ग 1 0
6 रत्नागिरी 5 1
  कोल्हापूर मंडळ एकुण 38 1
1 औरंगाबाद 3 0
2 औरंगाबाद मनपा 20 1
3 जालना 1 0
4 हिंगोली 1 0
5 परभणी 0 0
6 परभणी मनपा 0 0
  औरंगाबाद मंडळ एकूण 25 1
1 लातूर 0 0
2 लातूर मनपा 8 0
3 उस्मानाबाद 4 0
5 बीड 1 0
6 नांदेड 0 0
7 नांदेड मनपा 0 0
  लातूर मंडळ एकूण 13 0
1 अकोला 0 0
2 अकोला मनपा 12 0
3 अमरावती 0 0
4 अमवरावती मनपा 5 1
5 यवतमाळ 4 0
6 बुलढाणा 17 1
7 वाशीम 1 0
  अकोला मंडळ एकूण 40 2
1 नागपूर 1 0
2 नागपूर मनपा 38 1
3 वर्धा 0 0
4 भंडारा 0 0
5 गोंदिया 1 0
6 चंद्रपूर 0 0
7 चंद्रपूर मनपा 0 0
8 गडचिरोली 0 0
  नागपूर मंडळ एकूण 40 1
1 इतर राज्य 9 0
  एकूण 2334 160

दरम्यान, महाराष्ट्रासोबतच देशातील कोरोना व्हायरस बाधित रुग्णांचा आकडाही वाढतो आहे. देशभरातील सध्या उपचार घेत असलेल्या कोरोना व्हायरस रुग्णांची एकूण संख्या 8988  इतकी आहे. त्यातील 339 जणांचा मृत्यू झाला आहे. 1035 लोकांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, देशातील कोरोना व्हायरस बाधितर एकूण रुग्णांची संख्या 10,363 इतकी आहे.