Coronavirus: कोरोना व्हायरसमुळे नागरिक घाबरले; नागपूर येथे चीनी व्यक्ती आढळताच केले पोलिसांच्या स्वाधीन
संपूर्ण जगाला हादरवून सोडणारा कोरोना व्हायरस चीनमधून सर्वत्र पसरला आहे. यामुळे सर्वांच्या मनात चीनी लोकांच्याबाबतीत भिती निर्माण झाली आहे.
कोरोना व्हायरसचे (Coronavirus) थैमान जगभरात धुडगूस घालत आहे. संपूर्ण जगाला हादरवून सोडणारा कोरोना व्हायरस चीनमधून सर्वत्र पसरला आहे. यामुळे सर्वांच्या मनात चीनी लोकांच्याबाबतीत भिती निर्माण झाली आहे. चीनी नागरिकांना त्यांच्या चेहऱ्यावरून सहजपणे ओळखता येते. यातच नागपूर येथे एका चीनी नागरिक आढळून येताच नागपूरकरांनी (Nagpur) त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. चीनी येथील नागरिकाला पाहून काही काळासाठी पोलीसही चक्रावले होते. त्यानंतर पोलिसांनी संबंधित व्यक्तीला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. परंतु. त्याचा अहवाल निगेटीव्ह आल्याने त्याला सोडून देण्यात आले आहे. कोरोना व्हायरसने माजवलेल्या हाहाकारामुळे सर्वत्र भितीजनक वातावरण निर्माण झाले. चीन येथे जन्मलेल्या कोरोना व्हायरसने इटली, इराण, स्पेनमध्ये धुमाकूळ घातला आहे. या रोगावर अद्याप कोणतेही औषध नसल्यामुळे मोठया संख्येत लोकांचा मृत्यू होत आहे.
हुन हुवांग असे त्या चीनी नागरिकाचे नाव आहे. हुवांग यांचा मसाल्याचा व्यवसाय असून अनेक देशांत त्यांचे ये-जा असते. व्यवसायाच्या निमित्ताना हुवांग हे ऑक्टोबर महिन्यात बांगलादेश मध्ये गेले होते. त्यानंतर डिसेंबर महिन्यात ते भारतात दाखल झाले. भारतात आल्यानंतर हुवांग हे 13 फेब्रुवारी रोजी 2020 नागपूर येथून उमरेडला गेले. तिथे गेल्यानंतर ते एका हॉटेलमध्ये थांबले होते. हुवांग हे चीनी असून त्यांनाही कोरोना व्हायरसची लागण असल्याची शंका नागपूर येथील नागरिकांच्या मनात निर्माण झाली. त्यानंतर नागपूर येथील नागरिकांनी हॉटेल मालकावर दबाव टाकत हुवांग यांना बाहेर काढण्यासा सांगितले. याबाबत माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहचले. दरम्यान, हुवांग यांना पोलीस व्हॅनमध्ये बसवत त्यांना कोविड-19च्या ओपीडीत नेण्यात आले. बुधवारी सकाळी त्यांचे नमुने निगेटीव्ह येताच सर्वांना दिलासा मिळाला. सध्या हुवांग हे भारतातच आहेत. लॉकडाऊन संपल्यानंतर त्यांना पुन्हा त्यांच्या मायदेशी पाठवण्यात येणार आहे. हे देखील वाचा- Coronavirus: Parle G कंपनीची मोठी घोषणा; आता अशाप्रकारे करणार गोर गरिबांना मदत
कोरोना व्हायरसने भारतातही धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. सुरुवातील केरळ येथे 3 कोरोना बाधीत रुग्ण आढळले होते. त्यानंतर भारतात कोरोनाबाधितांच्या संख्येने 600 चा आकडा पार केला आहे. महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 122 वर पोहोचली आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आज दुपारपर्यंत 116 होती. मात्र, मुंबईत 5 तर ठाण्यात 1 असे एकूण 6 नवे रुग्ण आढळले आहेत. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. महाराष्ट्रात आज दिवसभरात 15 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.