Coronavirus: कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर क्वारंटाइनच्या नियमांचे 52 वर्षीय व्यक्तीकडून भंग, भिवंडी पोलीसात महापालिकेकडून FIR दाखल
त्याची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला 14 दिवस क्वारंटाइन राहण्यास सांगितले होते.
Coronavirus: मुंबईत कोरोनाच्या रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करावे असे आवाहन वारंवार केले जात आहे. तसेच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुद्धा असे म्हटले आहे की, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल. अशातच आता गोवंडी परिसरातील एका 52 वर्षीय वृद्धाकडून नियमांचे उल्लंघन करण्यात आले आहे. त्याची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला 14 दिवस क्वारंटाइन राहण्यास सांगितले होते. मात्र त्याने नियम मोडल्याने त्याच्या विरोधात गोवंडी मधील पोलीस स्थानकात महापालिकेने एफआयआर दाखल केला आहे.
नागरिकांना जर पुन्हा लॉतडाऊन नको असेल तर त्यांनी मास्क घालण्यासह नियमांचे पालन करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. तसेच मुंबईत गेल्या दोन-तीन दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ होऊ लागली आहे. दिवसाला 1 हजारांहून अधिक रुग्ण आढळून येत असल्याने महापालिकेकडून कठोर पावले उचलली जात आहे. तसेच मास्क न घालणाऱ्यांच्या विरोधात सुद्धा आता महापालिकेसह मुंबई पोलिसांना दंड आकारण्यास परवानगी दिली गेली आहे.(Coronavirus In Mumbai: मुंबईकरांची चिंता वाढली! कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत आज मोठी वाढ)
Tweet:
दरम्यान, राज्यात लॉकडाऊन करण्याची माझी पुन्हा इच्छा नाही असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले पण मजबूरी सुद्धा आहे. त्यामुळे जर नागरिकांना लॉकडाऊन नको असेल तर त्यांनी मास्क घालावा असे ही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. तर आज राज्यात कोरोनाचे आणखी 3753 रुग्ण आढळले असून गेल्या 24 तासात 62 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांचा आकडा 21,55,070 वर पोहचला आहे.