Coronavirus: पुणे जिल्ह्यात आढळला आणखी एक कोरोना बाधीत रुग्ण; पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांची माहिती
भारतातून महाराष्ट्रात सर्वाधिक 63 रुग्ण आढळले आहेत. यातच पुणे शहरात आणखी एक कोरोना बाधीत रुग्ण आढळले आहे, अशी माहिती पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर (Deepak Mhashekar), यांनी दिली आहे.
कोरोना व्हासरसने (Coronavirus) संपूर्ण जगात धुमाकूळ घातला असून भारतातही कोरोना बाधीत रुग्णाच्या आकड्यात झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. भारतातून महाराष्ट्रात सर्वाधिक 63 रुग्ण आढळले आहेत. यातच पुणे शहरात आणखी एक कोरोना बाधीत रुग्ण आढळले आहे, अशी माहिती पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर (Deepak Mhashekar), यांनी दिली आहे. या रुग्णाला तातडीने नायडू रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले आहे. कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात थैमान घातला असून आतापर्यंत 11 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 2 लाखांहून अधिक लोकांना याची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे लोकांमध्ये भीतीजनक वातावरण निर्माण झाली आहे. सध्या प्रत्येक देश कोरोना व्हायरसशी झुंज देत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. त्या जनता कर्फ्यूला सगळ्यांनी 100 टक्के प्रतिसाद द्यावा असे आवाहन पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी केले आहे. रक्तपेढ्यांमधील रक्ताचा साठा कमी झाला आहे. त्या अनुषंगाने रक्तदान कऱण्याचे आवाहनही म्हैसेकर यांनी केले आहे. ब्लड बँकांसोबत बैठक घेतली त्यानंतर रक्तसाठा कमी असल्याचे समजले आहे. असे असले तरीही त्या ठिकाणी गर्दी करु नका, असेही त्यांनी म्हटले आहे. होम क्वारंटाईन केलेल्या व्यक्ती जर बाहेर आढळल्या तर त्यांचा व्हिडीओ काढून आम्हाला पाठवा. त्यांच्याशी वाद किंवा भांडण करु नका, असेही म्हैसेकर यांनी म्हटले आहे. हे देखील वाचा- मुंबई: मध्य रेल्वेचा उद्याचा मेगाब्लॉक रद्द; मात्र 'जनता कर्फ्यू' मुळे 60% लोकल सेवा सुरु राहणार
कोरोना व्हायरसने जगभरात 11 हजारांपेक्षा जास्त लोकांचे बळी घेतले आहे. त्यामुळे या गंभीर आजाराबाबत लोकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. भारतात करोनाचे 298 रुग्ण आढळले आहेत, तर महाराष्ट्रात 64 जणांना करोना व्हायरसची लागण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मार्चला जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले आहे. जनता कर्फ्यू दरम्यान सकाळी 7 ते रात्री 9 या दरम्यान नागरिकांना घरबाहेर पडू नका, असे सांगण्यात आले आहे. जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने देखील अनेक एक्सप्रेस रेल्वे रद्द केल्या आहेत.
तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात रक्ताचा साठा कमी झाला आहे. त्यामुळे आपतकालीन स्थितीत रुग्णांच्या उपचारावर मर्यादा येत आहेत. त्यामुळेच पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी नागरिकांना रक्तदानाचे आवाहन केले आहे.