Coronavirus: धारावी येथील सार्वजनिक शौचालयांचे महापालिकेकडून निर्जंतुकीरण, परिसरातील कोरोनाबाधितांचा आकडा 22 वर

या परिसरातील नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई आहे. मात्र तरीही कोरोनाबाधितांचा आकडा येथे वाढत चालला असून आता 22 वर पोहचली आहे. याच पार्श्वभुमीवर धारावी येथील सार्वजनिक शौचालये महापालिकेकडून स्वच्छ आणि निर्जंतुकीकरण करण्यात आले आहेत.

Public toilets santizes by BMC (Photo Credits-ANJ)

महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधितांचा आकडा आता 1380 वर पोहचला आहे. राज्यातील सध्याची परिस्थिती अधिक गंभीर असून नागरिकांनी सरकारच्या नियमांचे पालन आता काटेकोरपणे करणे अत्यावश्यक आहेत. तर मुंबईतील दाट लोकवस्तीच्या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने परिसर सील करण्यात आले आहेत. याच पार्श्वभुमीवर धारावी  (Dharavi) येथे मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी असून तेथे ही कोराचे रुग्ण आढळून आले आहे. या परिसरातील नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई आहे. मात्र तरीही कोरोनाबाधितांचा आकडा येथे वाढत चालला असून आता 22 वर पोहचली आहे. याच पार्श्वभुमीवर धारावी येथील सार्वजनिक शौचालये महापालिकेकडून स्वच्छ आणि निर्जंतुकीकरण करण्यात आले आहेत.

मुंबई शहरामध्ये वाढत्या कोरोनाग्रस्तांची संख्या पाहता आता मुंबई महानगर पालिकेने धारावीतील भाजी विक्रेते, फळ विक्रेते सह फेरीवाल्यांना धारावीतील कंटेनमेंट झोन, बफर झोन मध्ये आता व्यवसाय करण्यावर बंदी घातली आहे. तर धारावीत दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. गुरुवारी धारावी येथे कोरोना व्हायरसचे नवे 3 रुग्ण आढळून आले होते. तसेच कोरोनामुळे धारावीत मृतांचा आकडा 3 वर पोहचला आहे. मात्र धारावीत दाट वस्ती असल्याने सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाची अंमलबजावणी करणे अशक्य आहे. पण कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता महापालिका तेथील शौचालये स्वच्छ करण्यासोबत निर्जंतुक करण्याचे काम करत आहेत.(Coronavirus: कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर सोशल मीडियात संवेदनशील, चुकीची माहिती देण्यास मनाई; पोलीस उपायुक्तांकडून आदेश

जारी)

दरम्यान, एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण धारावीत आढळून आला होता. यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने धारावीतील काही भाग सील करण्यात आला. मात्र त्यावेळी काही लोकांनी बीएमसी कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याचा प्रकार घडल्याचे दिसून आले. या प्रकरणी आरोपींच्या विरोधात विविधा कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.