Coronavirus: WhatsApp वापरकर्त्यांसाठी महाराष्ट्र सायबर पोलिसांकडून COVID-19 साथीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक नियमावली जारी

अथवा कायदा मोडणाऱ्यांविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 153 (अ), 153 (ब), 295 (अ) अन्वये कारवाई करण्यात येईल असा स्पष्ट इशारा महाराष्ट्र सायबर सेलने दिला आहे.

Advisory for WhatsApp Users by Maharashtra Cyber | (Photo credit: archived, edited, symbolic images)

Advisory for WhatsApp Users by Maharashtra Cyber: अवघे जग COVID-19 म्हणजेच कोरोना व्हायरस (Coronavirus) या साथीच्या आजाराने ग्रासले आहे. भारत आणि महाराष्ट्रातही हा साथीचा आजार आपला प्रादूर्भाव वाढवत आहे. अशा स्थितीत संपूर्ण देश लॉकडाऊन करुन योग्य ती घबरदारी घेतली जात आहे. असे असताना काही महाभाग मात्र सोशल मीडियाचा वापर करत या गंभीर आजाराबाबत दिशाभूल करणारे संदेश, अफवा अथवा चुकीची माहिती पसरवत आहेत. याची गांभीर्याने नोंद घेत महाराष्ट्र पोलीस सायबर (Maharashtra Cyber) विभाग सतर्क झाला आहे. महाराष्ट्र सायबर विभागाने एक मार्गदर्शक नियमावलीच जारी केली आहे. खास करुन ही मार्गदर्शक नियमावली ही WhatsApp युजर्ससाठी आहेत.

काय आहे मार्गदर्शक नियमावलीत?

महाराष्ट्र सायबर विभागाने दिलेल्या निर्देशांची नियमावली पीडिएफ रुपात पाहण्यासाठी इथे क्लिक करा. (हेही वाचा, Coronavirus: मुंबई पोलिसांनी 'आम्ही घरी असतो तर काय केले असते' हे सांगत शेअर केला भावनिक व्हिडिओ, Must Watch)

ग्रूप अॅडमीनसाठी सूचना

दरम्यान, कायदेशीर कारवाई पासून स्वत:चा बचाव करायचा असेल तर सोशल मीडियावर वरील संदेशाचे पालन करा. अथवा कायदा मोडणाऱ्यांविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 153 (अ), 153 (ब), 295 (अ) अन्वये कारवाई करण्यात येईल असा स्पष्ट इशारा महाराष्ट्र सायबर सेलने दिला आहे.