Coronavirus: मालेगाव येथे बंदोबस्तावर असताना संक्रमित झालेले 87 पोलीस कर्मचाऱ्यांची कोरोनावर मात

खबरदारीचा उपाय म्हणून देशात लॉकडाउन कायम ठेवण्यात आला आहे. लॉकडाउनच्या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद ठेवण्यात आले आहे.

कोरोना विषाणूचा (Coronavirus) वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून ठोस पावले उचलली जात आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून देशात लॉकडाउन कायम ठेवण्यात आला आहे. लॉकडाउनच्या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद ठेवण्यात आले आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी आणि सफाई कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न उत्तम कामगिरी बजावत आहेत. मात्र, कोरोनाशी लढा देत असताना अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यातच नाशिक (Nashik) येथील मालेगाव (Malegaon) परिसरात बंदोबस्तावर असताना कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले 87 पोलीस कर्मचारी (Maharashtra Police) कोरोनामुक्त झाले आहेत.

कोरोना विषाणूने संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडले आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पोलीस कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत आहेत. दरम्यान, अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असताना मालेगाव येथे बंदोबस्तावर असलेले 87 पोलीस कर्मचारी करोनामुक्त झाले आहेत. यात नाशिक ग्रामीण पोलीस दल-41, राज्य राखीव दल- 43, मरोळ पोलीस प्रशिक्षण केंद्रातील एक तर, जळगाव पोलीस दलातील 2 असे एकुण 87 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. हे देखील वाचा- महाराष्ट्र: धुळे येथे लॉकडाउन आणि संचारबंदी कायम असताना दुकानदारांसह नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन

नाशिक पोलिसांचे ट्वीट-

माहितीनुसार, महाराष्ट्र पोलिसांतील 1373 जणांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. त्यात नव्याने नोंद झालेल्या कोरोना संक्रमित 131 पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. एकूण संक्रमितांपैकी 291 पोलीस कर्मचारी उपचारानंतर बरे झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, आतापर्यंत 11 पोलीसांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.