Coronavirus: मुंबई विमानतळावर काम करणाऱ्या पनवेल येथील CISF च्या 5 जवानांना कोरोना व्हायरस लागण

पनवेलमध्ये ज्या परीसरातील इमारतीत हे पाच सीआयएसएफ रुग्ण आढलले आहेत ती इमारत नवी मुंबई महापालिकेने बंद केली आहे. या इमारतीत राहणाऱ्या इतरही काही रहिवाशांची कोरोना व्हायरस चाचणी केली जाण्याची शक्यता आहे.

Coronavirus: मुंबई विमानतळावर काम करणाऱ्या पनवेल येथील CISF च्या 5 जवानांना कोरोना व्हायरस लागण
COVID-19 | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाबाबत एक धक्कादायक वृत्त हाती येत आहे. मुंबई विमानतळ (Mumbai Airport) येथे काम करणाऱ्या 5 CISF जवानांना COVID-19 बाधा झाल्याचे पुढे आले आहे. या पाचही जणांचे कोरोना व्हायरस चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. हे पाचही जवान हे नवी मुंबई (Navi Mumbai) येथील पनवेल परिसरात राहणारे आहेत. प्राप्त माहितीनुसार दोनच दिवसांपूर्वी पनवेल येथील एका सीआयएसएफ (CISF) जवानाला कोरोना व्हायरस संसर्ग झाल्याचे पुढे आले होते. त्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या पाच जवानांची कोरोना व्हायरस चाचणी करण्यात आली. या चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला.

प्राप्त माहितीनुसार, नवी मुंबई शहरात कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. ही संख्या पनवेल, वाशी, कोपरखैरणे आणि नेरुळ येथील असल्याचेही पुढे आले आहे. दरम्यान, पनवेलमध्ये ज्या परीसरातील इमारतीत हे पाच सीआयएसएफ रुग्ण आढलले आहेत ती इमारत नवी मुंबई महापालिकेने बंद केली आहे. या इमारतीत राहणाऱ्या इतरही काही रहिवाशांची कोरोना व्हायरस चाचणी केली जाण्याची शक्यता आहे. या पाच जवानांसह पनवेलमधील कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या जवळपास आठवर पोहोचली आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिले आहे. (हेही वाचा, Coronavirus: मुंबईमधील धारावी झोपडपट्टी मध्ये आढळला कोरोना विषाणूचा रुग्ण; उपचार सुरु, कुटुंबालाही ठेवले वेगळे)

दरम्यान, वाशी येथे राहात असलेल्या एका विदेशी नागरिकास कोरोना व्हायरस झाला होता. हा नागरिक फिलिपीन्स येथून आला होता. या नागरिकाच्या संपर्कात आलेल्या काही नागरिकांनाही कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्याचे पुढे येत आहे. दरम्यान, मुंबई शहरातील धारावी झोपडपट्टी येथे असलेल्या शाहूनगर परिसरातही एका व्यक्तीस कोरोना व्हायरस संसर्ग झाल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे येथील परिसरही मुंबई महापालिकेने सील केला आहे.

(The above story first appeared on LatestLY on Apr 01, 2020 09:25 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).