महाराष्ट्रात पोलीस दलातील 227 जणांची कोरोना व्हायरसची चाचणी पॉझिटिव्ह
त्यामुळे नागरिकांना लॉकडाउनच्या नियमाचे अधिक काटेकोरपणे पालन करावे अशा सुचना दिल्या जात आहेत. तरीही नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन करण्यात येत असल्याने पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे.
देशभरासह महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. त्यामुळे नागरिकांना लॉकडाउनच्या नियमाचे अधिक काटेकोरपणे पालन करावे अशा सुचना दिल्या जात आहेत. तरीही नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन करण्यात येत असल्याने पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. पोलीस दलातील कर्मचारी सुद्धा अहोरात्र त्यांचे कर्तव्य बजावत आहेत. याच दरम्यान आता महाराष्ट्रात पोलीस दलातील 227 जणांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. यामध्ये 30 पोलीस अधिकाऱ्यांचा सुद्धा समावेश असल्याची माहिती देण्यात आली आहे.
राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 10 हजारांच्या पार गेला आहे. कोरोनाबाधितांच्या रुग्णांवर दिवस रात्र वैद्यकिय कर्मचारी, डॉक्टर्स आणि नर्स उपचार करत आहेत. मात्र यामध्ये पोलिसांचे सुद्धा बहुमोलाचे कार्य आहे. त्यामुळे राज्य सरकारने पोलिसांवर हल्ले केल्यास कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंत हजारोंच्या संख्येने लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन केल्याने विविध राज्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान मुंबईतील वडाळा येथील एकाच पोलीस स्थानकातील 9 पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. तर तीन पोलीस कर्मचाऱ्यांचा मुंबईत मृत्यू झाला आहे.(Coronavirus: भारतात गेल्या 24 तासांत 1755 जणांना कोरोनाची लागण, तर 77 जणांचा कोरोनामुळे बळी; देशातील कोरोना बाधितांची संख्या 35365 वर पोहोचली)
दरम्यान, राज्याची रेड, ग्रीन आणि रेड झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे. तर 20 एप्रिल पासून कोरोनाच्या नॉन-हॉटस्पॉट ठिकाणी काही गोष्टींसाठी सुरु करण्यात आल्या आहेत. मात्र नागरिकांना सोशल डिन्टंन्सिंगच्या नियमाचे पालन करण्याच्या सुचना दिल्या आहेत. देशभरात एकूणच कोरोनाची परिस्थिती पाहता लॉकडाउन 4 मे नंतर आणखी दोन आठवड्यांनी वाढवला असल्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयाने जाहीर केला आहे.