कोरोनाग्रस्त रुग्णांची नावे जाहीर करा, यामुळे जनजागृती वाढेल- संदीप देशपांडे

असे केल्यास कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यास मदत होईल असेही संदिप देशपांडे यांनी सांगितले आहे.

Sandeep Deshpande (Photo Credits: Facebook)

कोरोनाग्रस्त (Coronavirus) रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ नये यासाठी सर्वजण योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. संपूर्ण जगभराचत कोरोनाचे लोण पसरत चालले महाराष्ट्रावर ही कोरोनाची काळी सावली पडली आहे. त्याचबरोबर रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. म्हणून लोकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी यासाठी कोरोनाग्रस्त रुग्णांची नावे जाहीर करा अशी मागणी मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी केली आहे. असे केल्यास कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यास मदत होईल असेही संदिप देशपांडे यांनी सांगितले आहे.

काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाच्या कुटूंबाला संपूर्ण गावाने वाळीत टाकल्याची घटना समोर आली होती. त्यामुळे पुणे विभागीय आयुक्त दिपक म्हैसेकर यांच्याकडे तक्रार केली होती. यावर त्यांनी कोरोनाची लागण झालेल्यांची नावं जाहीर न करण्याचं आवाहन करताना, नावं जाहीर करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा इशाराही दिला होता. Corona In Maharashtra: पुणे शहरात कोरोना व्हायरसची आणखी एकाला लागण; राज्यात रुग्णांचा आकडा 42

मात्र यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी "कोरोनाची लागण झालेले रुग्ण काही गुन्हेगार किंवा आरोपी नाहीत त्यामुळे त्यांची नावे जाहीर करा यामुळे जनजागृती निर्माण होईल." असे सांगितले आहे. तसेच जी लोकं कोरोनाची लागण झालेल्यांच्या संपर्कात आली आहेत त्यांनाही याची माहिती मिळेल, असेही ते म्हणाले. Coronavirus: 31 मार्चपर्यंत शहरातील ऑर्केस्ट्रा, डान्स बार, डिस्कोथेक, पब, लाइव्ह बँड,डीजे बंद; मुंबई पोलिसांचे आदेश

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसची (Coronavirus) सर्वात पहिली घटना आढळलेल्या पुणे (Pune) शहरात आज आणखी एकाला कोरोना संसर्गाची लागण झाल्याचे समजत आहे, यांनतर केवळ पुणे शहरातील रुग्णांंचा आकडा हा 18 तर संपूर्ण राज्यात रुग्णांंचा आकडा तब्बल 42 वर गेला आहे.

मुंबई शहरात कोरोना व्हायरसचा वाढता धोका विचारात घेऊन मुंबई पोलीस (Mumbai Police) सतर्क झाले आहेत. नागरिकांनी एकत्र येऊन गर्दी करु नये तसेच, कोरोना व्हायरस (Coronavirus) संभाव्य संसर्ग टळावा यासाठी मुंबई पोलिसांनी विशेष आदेश काढले आहेत. या आदेशानुसार मुंबईतील ऑर्केस्ट्रा / डान्स बार, डिस्कोथेक, पब, लाइव्ह बँड आणि डीजे बंद राहणार आहेत. मुंबई पोलिसांचा हा आदेश 31 मार्च पर्यंत लागू राहणार आहे.