मुंबई-नाशिक महामार्गावर कंटेनर उलटल्याने वाहतूक विस्कळीत

मुंबई- नाशिक महामार्गावर कंटेनर उलटल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.

Mumbai- Nashik Highway (Photo Credits- twitter)

Mumbai-Nashik Highway: मुंबई- नाशिक महामार्गावर कंटेनर उलटल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे या मार्गावरुन जाणाऱ्या वाहनांची लांबच्या लांब गर्दी पाहायला मिळत आहे.

रांजोळी जंक्शन जवळ ओवळी गावाजवळ कंटेनरचे स्टेअरिंग लॉक झाल्याने कंटेनर उलटल्याचे वृत्त समोर येत आहे. तर रस्त्यावर काचा खूप प्रमाणात फुटल्याचे दिसत आहे. या घटनेमुळे स्थानिक ठिकाणी अग्निशमन दलाची एक गाडी रवाना करण्यात आलेली आहे.

दरम्यान, महामार्गावरील वाहतूकीचा मार्ग वळविण्यात आला आहे. या महामार्गावरुन जाण्याऱ्या प्रवाशांनी पाइपलाईन रोज किंवा खारेगाव टोल-मुंब्रा बायपास- कल्याण मार्गे जाण्याचे आवाहन पोलिसांकडून दिले जात आहे.